महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ नोव्हेंबर ।। भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिली टेस्ट पर्थमध्ये खेळवण्यात आली. या टेस्टमध्ये जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने विदय मिळवला आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या सिरीजमधील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने कांगारूंना त्यांच्याच मैदानावर धूळ चारली. या विजयामुळे या सिरीजमध्ये भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे.
टीम इंडियाचा २९५ रन्सने मोठा विजय
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टेस्ट सिरीजमधील पहिला सामना पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात भारताने 295 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 534 रन्सचं लक्ष्य होतं. ज्याचा पाठलाग करणं जवळपास अशक्य मानलं जात होतं.
ऑस्ट्रेलियन टीमचा दुसरा डाव केवळ 238 रन्सवर आटोपला. या विजयासह टीम इंडियाने टेस्ट सिरीजमध्ये १-० अशी आघाडी घेतलीये. या सिरीजमधील दुसरा सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळवला जाणार आहे.
ऑस्ट्रेलियन टीमचा दुसरा डाव केवळ 238 रन्सवर आटोपला. या विजयासह टीम इंडियाने टेस्ट सिरीजमध्ये १-० अशी आघाडी घेतलीये. या सिरीजमधील दुसरा सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळवला जाणार आहे.
पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर झालेल्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच पराभवाला सामोरं जावं लागलंय. याआधी ऑस्ट्रेलियाने या मैदानावर चार सामने खेळले होते, ज्यात त्यांनी विजय मिळवला होता. 19 जानेवारी 2021 रोजी भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध गाबामध्ये विजय मिळवला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने ३१ वर्षांनी त्या मैदानावर टेस्ट सामना गमावला होता. त्यानंतर आता भारतीय संघानेही पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर कांगारूंना धुव्वा उडवला आहे.
पर्थ टेस्टसाठी कशी होती भारताची प्लेईंग ११
केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज.