महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ नोव्हेंबर ।। राज्यात थंडीचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे भाज्यांच्या किंमतीदेखील वाढत आहे. थंडी वाढत असल्याने भाज्यांच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसत आहे. शेवगा आणि लसूणच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.
ऐन थंडीत लसणाच्या किंमतीत वाढ जाली आहे. किरकोळ बाजारात लसूण ५०० रुपये किलोला विकल्या जात आहेत. त्याचसोबत कांद्याच्यादेखील किंमती वाढल्या आहेत.कांद्याच्या किंमती १०० ते ११० दरम्यान आहेत.
भाज्यांच्या किंमती
सध्या बजारात शेवगा ४०० रुपये किलोवर विकले जात आहे. वांगी ६० रुपये किलोंवर विकले जात आहे. अदरक १०० रुपये किलोवर विकले जात आहेत. लिंबू ११५ रुपये किलोवर विकले जात आहेत. दूधीची किंमत ५१ रुपये आहे. भाज्यांच्या किंमती वाढल्याने गृहिणींना आता भाजी घ्यायची की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
धाराशिवच्या भुम तालुक्यात ढगाळ वातावरण व हवेतील बदलामुळे ऐन बहरातील तुरीला मोठा फटका बसु लागला आहे त्यात धुक्याचेही प्रमाण वाढले आहे यामुळे तुरीवर अळ्यांचा प्रादुर्भाव होणे सुरू झाले आहे.यंदा तालुक्यात जुन महीन्यापासुन चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी तुरीची पेरणी मोठ्या प्रमाणात केली आहे. मागील दोन तीन वर्षात पुरेशा पावसाअभावी खरीप व रब्बी पिकांना मोठा फटका बसला होता.वातावरणाचा परिणाम तुर पिकावर होत असल्याचे प्रमाण वाढले आहे यामुळे शेतकर्यांनी तुरीवर अळीच्या नियञंणासाठी निंबोळी अर्क,प्रोफेनफॉस,इमामेथिन,बेनझॉइडची फवारणी करावी व फवारते वेळी तोंडाला मास्क लावुन आरोग्याची काळजी अस आवाहन कृषी विभागाने केलय.