Garlic Benefits: दररोज सकाळी खा कच्चा लसूण, होतील आश्चर्यकारक फायदे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ नोव्हेंबर ।। लसणाचा(Garlic Benefits) वापर भारतीय पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. यामुळे जेवणाची चव वाढते. यासोबतच आरोग्यासाठीही लसूण खूप फायदेशीर आहे.

लसणामध्ये एलिसिन नावाचा घटक असतो जो अँटीव्हायरल, अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट गुणांनी भरपूर असतो. सोबतच याच व्हिटामिन आणि पोषकतत्वे मोठ्या प्रमाणात असतात. व्हिटामिन बी१, बी६, सी सोबतच मँगनीज, कॅल्शियम, कॉपर, सेलेनियम आणि अनेक खनिजे असतात.

दररोज लसणीचे सेवन केल्याने अनेक प्रकारचे आजार दूर राहण्यास मदत होते. लसूण खाण्याची योग्य पद्धती सकाळी रिकाम्या पोटी खाणे. तुम्ही एका दिवसांत ३ ते ५ पाकळ्या लसणीचे सेवन करू शकता. हे खाल्ल्याने जर शरीरातून दुर्गंधी येत असेल तर लसूण सोलून त्याचे छोटे छोटे तुकडे करून भिजवून सकाळी याचे सेवन करा.

जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असेल, कोलेस्ट्रॉल अथवा हृदयाशी संबंधित आजार असतील तर लसूण रात्री भिजत घालून सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा. सर्दी खोकल्यामध्येही लसूण अतिशय फायदेशीर आहे. श्वासासंबंधित आजारांमध्ये लसणाचा फायदा होतो.

लसणाच्या वापरामुळे पचनतंत्रही मजबूत होते. यातील अनेक पोषकतत्वे जेवण पचवण्यास मदत करतात. लसणाचे सेवन केल्याने स्किन हेल्दी आणि चमकदार बनते. सोबतच लसणाचा केसांसाठीही फायदा होतो.

टीप – वरील लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणतेही उपाय अंमलात आणण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *