MHADA च्या सोडतीमध्ये ‘ते’ अर्जदार ठरले लाभार्थी; पाहा कोणाला मिळणार हक्काचं घर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ डिसेंबर ।। स्वप्नाच्या घरासाठी अनेकजण जीवाचा आटापिटा करत असतात. अनेकदा हे स्वप्न नकळतपणे फार सहजगत्या साध्य होतं. पण, कैकदा त्यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागते. अशीच प्रतीक्षा सध्या खऱ्या अर्थानं फळली असं म्हाडाच्या घरांच्या प्रतीक्षेत असणारे अर्जदार सध्या म्हणत आहेत. कारण, सुरुवातीला मिळालेल्या अपयशानंतर आता या अर्जदारांना त्यांचं हक्काचं घर मिळालं आहे.

म्हाडाची नवी लॉटरी की आणखी काही?
ऑक्टोबर 2024 मध्ये म्हाडानं 2030 घरांची सोडत काढली. ज्यानंतर या सोडतीतील विजेत्यांची नावंही जाहीर करण्यात आली. पण, म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या यंदाच्या सोडतीमधील जवळपास 442 विजेत्यांनी विविध कारणात्सव त्यांच्या घरांचा ताबा सोडला. अर्थात ती घरं म्हाडाकडेच सरेंडर केली.

अर्ज सोजडत प्रक्रियेतून सरेंडर झालेल्या याच घरांपैकी 406 घरं आता या सोडतीमध्ये प्रतीक्षा यादी (Waiting List) मध्ये असणाऱ्यांना देण्यात आली असून, त्यांना या प्रक्रियेत विजेते गणत म्हाडानं नुकतीच या अर्जदारांना स्वीकृती पत्रही पाठवली आहेत. सदर घरांच्या स्वीकृतीसाठी म्हडानं 15 दिवसांची मुदतही दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *