Traffic Rules: वाहतुकीचे नियम मोडताय? किती भरावा लागेल दंड? जाणून घ्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ डिसेंबर ।। रस्त्यावर वाहन चालवताना काही नियम असतात. सिग्नल, हेल्मेट, लायसन्स असणाऱ्या व्यक्तीनेच वाहन चालवायला हवे, असे नियम प्रत्येक वाहनचालकाने पाळायला हवे. जर तुम्ही हे नियम पाळले नाही तर कदाचित अनर्थ होऊ शकतो. सिग्नल न पाळल्यास अपघातदेखील होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळायलाच हवे.

बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्यांना आळा घालण्यासाठी काही नियम सरकारने तयार केले आहे. वाहतूकीचे नियम न पाळल्यास तुम्हाला दंड भरावा लागतो. वाहतुकीचे नियम मोडल्यास नव्या दंडांची यादी पाहा.(Penalty For breaking Traffic Rules)

फॅन्सी नंबरप्लेट (Fancy Numberplate)

जर तुमच्या वाहनाला फॅन्सी नंबरप्लेट असेल तर तुम्हाला १००० रुपये दंड भरावा लागणार आहे. याआधी १०० रुपये दंड होता.

रिफ्लेक्टर्स न लावणे

जर तुम्ही रिफ्लेक्टर्स लावले नाही तर तुम्हाला १००० रुपये दंड भरावा लागणार आहे. याआधी तुम्हाला १०० रुपये दंड भरावा लागत होता.

विना हेल्मेट वाहन चालवणे (Without Helmate Driving)

जर विना हेल्मेट वाहन चालवत असाल तर तुम्हाला ५०० रुपयांचा दंड भरावा लागेल. मागे बसणाऱ्या व्यक्तीकडेही हेल्मेट असणे गरजेचे आहे.

लायसन्सशिवाय गाडी चालवणे (Without License Driving)

जर तुम्ही परवानाशिवाय वाहन चालवत असाल तर ५०० रुपये दंड भरावा लागेल. याआधी ३०० रुपये दंड होता.

अतिवेग

जर तुम्ही अतिवेगाने वाहन चालवत असाल तर १००० रुपये दंड भरावा लागेल. याआधी २०० रुपये दंड होता.

धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे

धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्यास २००० रुपये दंड भरावा लागणार आहे.

फिट नसताना गाडी चालवणे

जर तुम्ही शारिरिकदृष्ट्या फिट नसताना गाडी चालवत असाल तर ५०० रुपये दंड भरावा लागेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *