महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ डिसेंबर ।। भाजपने महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुका फसवणूक करून जिंकल्या आहेत. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत आणि त्याची पोलखोल मी देशासमोर करणार, असा बॉम्ब आज दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी फोडला. दिल्लीतही भाजपकडून तसेच षड्यंत्र रचले जात आहे मात्र ते आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे केजरीवाल यांनी बजावले.
महाराष्ट्रात महायुती सरकारविरुद्ध प्रचंड रोष असताना धक्कादायक निकाल लागले. सत्ताधारी पक्षाला प्रचंड मोठे बहुमत मिळाले. ईव्हीएम झोल करून हा विजय मिळवण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला आहे. राज्यात मोठे जनआंदोलनही उभे राहत आहे. त्याचवेळी आता केजरीवाल यांनी हरियाणा आणि महाराष्ट्रातील निकालांवर थेट आक्षेप घेत भाजपवर बॉम्ब टाकला आहे.