महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ डिसेंबर ।। महाराष्ट्राच्या राजकारणात आज महत्त्वाचा दिवस. गेल्या तीन- चार वर्षात झालेल्या सत्तानाट्यानंतर २०२४ च्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि महायुतीला एकहाती सत्ता मिळाली. महाविकास आघाडीची मोठी पिछेहाट झाली. मतमोजणी नंतर १२ दिवसांनी आज महाराष्ट्राला नवे मुख्यमंत्री मिळणार आहेत.पण मतमोजणीनंतर विधानसभेत महायुतीला मिळालेलं बहुमत ही ईव्हीएमची कमाल असल्याचा आरोप विरोधकांनी केला. हारल्यानंतर विरोधक ईव्हीएममवर खापर फोडत असल्याची टीका विरोधकांवर केली. पण दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी देखील ईव्हीएममवर आक्षेप घेतला होता. ईव्हीएमम मतदानानं लोकशाही संपल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
अभिनेते किरण माने यांनी आता बाळासाहेब ठाकरे यांच्या जु्न्या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी एक खास कॅप्शनही लिहिलं आहे. आज काळाच्या कसोटीवर या मुलाखतीतला शब्द न शब्द खरा ठरलाय.शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या विचारांनी चालणं म्हणजे ऐर्यागैर्याचं काम नाही. महाशक्तींना न घाबरता ‘सत्य’ बोलायची अंगात धमक लागते ! खरी शिवसेना कुठली? हा निकाल नियतीचं न्यायालयच आज देतेय ! शिवसेना कुणापुढे लाचार आणि हतबल होऊच शकत नाही. स्वाभिमान आणि सत्ता दोन्हीतलं एक निवडायची वेळ येते तेव्हा खरा शिवसैनिक सत्ता लाथाडतो.
जय महाराष्ट्र … असं किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलंय.
काय म्हणतायत बाळासाहेब ठाकरे या व्हिडिओत?
आता हे बटणाचं राज्य सुरू झालंय. बटण दाबलं की एका पार्टीकडे मत जाणार. काल पर्वा जन्मास आलेले पक्ष लाखालाखांच्या आघाड्या घेतातच कशा? याचा विचार होणार आहे की नाही? ते आता सिद्ध झालंय. त्या वेळी खरंच शिक्का मारून मतदान व्हायचं, प्रमाणिकपणानं. तेव्हा खरी लोकशाही होती. आता लोकशाही म्हणजे खल्लास झाली , संपली. यानंतर बाळासाहेबांना मतदान यंत्रामध्ये बिघाड आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला, यावर त्यांनी निश्चित या मतदान यंत्रात बिघाड आहे, असं म्हटलं होतं.