महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ डिसेंबर ।। भारत सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठीदेखील अनेक योजना राबवल्या आहेत. प्रत्येक राज्याने महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत. महिला सशक्तिकरणासाठी ही योजना राबवली जाते.सरकारने महिलांसाठी वीमा सखी योजना राबवली आहे.या योजनेअंतर्गत महिलांना ७००० ते २१००० रुपये दिले जातात.
ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना राबवण्यात आली आहे. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना राबवली जाणार आहे. (Vima Sakhi Yojana For Women)
वीमा सखी योजना (Vima Sakhi Yojana)
महिलांसाठी वीमा सखी योजना राबवली आहे. महिलांना या योजनेत वीमाशी संबंधित काम दिले जाते. त्यानंतर त्यातून त्यांना महिन्याला उत्पन्न दिले जाते. भारतीय वीमा निगममध्ये महिलांना वीमा सखी म्हणून नियुक्त केले जाईल. त्यानंतर त्यांना एलआयसी एजेंट केले जाते.
ग्रामीण क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना या योजनेमुळे रोजगार निर्माण होणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आत्मनिर्भर केले जाते.
मिळणार इतके रुपये
वीमा सखी योजनेत महिलांना ७,००० ते २१,००० रुपये दिले जातात. सुरुवातीला ७००० रुपये सरकाकडून दिले जातात. त्यानंतर पुढच्या वर्षी ही रक्कम १००० रुपयांनी कमी केली जाते. त्यानंतर तिसऱ्या वर्षी ५००० रुपये दिले जातात.याचसोबत महिलांना २१००० रुपये दिले जातात. तसेच तुम्ही टार्गेट पूर्ण केल्यावर कमिशनदेखील दिले जाते.
सरकारकडून या योजनेच्या सुरुवातील पहिल्या फेजमध्ये महिलांना ३५,००० रुपये वीमा एजंटसाठी दिले जाते. या योजनेत महिलांना ५०,००० रुपयांचादेखील लाभ मिळू शकतो. १८ ते ५० वर्षांपर्यंतच्या महिला या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांची शैक्षणिक पात्रता १०वी पास असणे गरजेचे आहे.