महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ डिसेंबर ।। भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा कसोटी सामन्याचा निकाल तीन दिवसात लागतोय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताचा पहिला डाव १८० धावांवर गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावातही दादागिरी दिसतेय. दुसऱ्या डावात भारताचा निम्मा संघ ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी १०५ धावांवर तंबूत पाठवला आहे. मिचेल स्टार्कच्या भन्नाट बनाना स्विंगने शुभमन गिलचा उडवलेला त्रिफळा अविश्वसनीय होता. त्यात पॅट कमिन्सने एकदम सहजतेने रोहित शर्माचा ऑफ स्टम्प उडवून भारताला अडचणी आणले आहे.
भारताच्या १८० धावांच्या प्रत्यु्त्तरात त्यांनी ३३७ धावा करताना १५७ धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन मॅकस्वीनी ( ३७) व मार्नस लाबुशेन ( ६४) यांच्यानंतर हेडने एकट्याने खिंड लढवली. अर्थात सिराज व ऋषभ पंत यांनी झेल सोडून त्याला साथच दिली. त्यामुळे हेडचे मनोबल उंचावले आणि त्याने १४१ चेंडूंत १७ चौकार व ४ खणखणीत षटकारांसह १४० धावांची खेळी साकारली.
CASTLED!
Mitch Starc gets some "banana swing" to make a mess of Shubman Gill's stumps 🍌#DeliveredWithSpeed | @NBN_Australia | #AUSvIND pic.twitter.com/sP41huXm4F
— cricket.com.au (@cricketcomau) December 7, 2024
भारताला दुसऱ्या डावातही अपयश आले. लोकेश राहुल ७ धावांवर माघारी परतल्यानंतर यशस्वी जैस्वाल व शुभमन गिल या युवा खेळाडूंनी सकारात्मक खेळ केला होता. पण, स्कॉट बोलंडने ही जोडी तोडली. यशस्वीला त्याने त्याच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर झेल देण्यास भाग पाडले. विराट कोहली मैदानावर येताच मोठा जल्लोष झाला. पण पुन्हा एकदा तो फेल गेला. बॉलंडने सापळा रचून एकाच लाईन लेंथवर चेंडू टाकूत विराटला झेलबाद केले. त्यानंतर आलेल्या मिचेल स्टार्कने कहर केला. त्याच्या बनाना स्विंगने शुभमनचा त्रिफळा उडवला. कर्णधार पॅट कमिन्सनेही अप्रतिम चेंडूवर रोहित शर्माचा त्रिफळा उडवून भारता १०५ धावांवर पाचवा धक्का दिला.
रोहितने कसोटीच्या मागील १२ डावांत ६,५, २३, ८, २, ५२, ०, ८, १८, ११, ३, ६ अशा ११.८३च्या सरासरीने धावा केल्या आहेत.