X डाऊन, पोस्ट दिसेनात, नेमकं काय झालं? ; एक तासानंतर X सेवा सुरळीत

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ एप्रिल । सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ( पूर्वीचे ट्विटर) डाऊन झाले आहे. भारतातील यूजर्सना X वरील पोस्ट दिसत नसल्याच्या तक्रारी नोंदवल्या आहेत. एलन मस्क यांच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर गुरुवारी सकाळी १०:५० च्या सुमारास मोठ्या प्रमाणात आउटेज दिसून आले. X ठप्प झाल्याने यूजर्संना पोस्ट पाहण्यात अडचणी जाणवल्या. दरम्यान, एक तासानंतर X सेवा सुरळीत सुरु झाली.

ऑनलाइन आउटेज आणि समस्यांचा मागोवा घेणाऱ्या Downdetector च्या माहितीनुसार, भारतातील सुमारे ४६४ यूजर्संनी X डाऊन झाल्याच्या तक्रारी नोंदवल्या आहेत. यूजर्सनी ते X प्लॅटफॉर्मवर प्रवेश करू शकत नसल्याचे म्हटले आहे. या आउटेज ट्रॅकिंग वेबसाइटनुसार, सकाळी १०:५० च्या सुमारास वेबसाइट आणि मोबाइल ॲप्लिकेशन अशा दोन्हीवर तांत्रिक समस्या दिसून आल्या.

आउटेज ट्रॅकर्सच्या लाइव्ह आउटेज नकाशानुसार, दिल्ली, जयपूर, लखनौ, अहमदाबाद, कटक, इंदूर, मुंबई, हैदराबाद, बंगळूर, कोलकाता आणि इतर शहरांसह संपूर्ण भारतातील यूजर्संनी X बाबत समस्या नोंदवल्या.

मेटाची मालकी असलेला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामला या महिन्याच्या सुरुवातीला असाच एक तास आउटेजचा सामना करावा लागला होता. आता X वर अशीच समस्या उद्भवली आहे. मार्चमध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, मेसेंजर आणि थ्रेड्सवर मोठ्या प्रमाणात आउटेज झाले होते. यामुळे यूजर्संना जवळजवळ दोन तास ॲप्समध्ये प्रवेश करता आला नव्हता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *