तयार कपड्यांवर आता 18 टक्के जीएसटी ! अब्जाधीशांचे कर्ज माफ करण्यासाठी गोरगरीबांच्या पैशांची लूट ; राहुल गांधी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ डिसेंबर ।। अब्जाधीशांचे कर्ज माफ करण्यासाठी मोदी सरकार गोरगरीबांच्या पैशांची लूट करीत आहे. ऐन लग्नसराईत आता तयार कपड्यांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात येणार असल्याचा बॉम्बगोळा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी टाकला. या जुलमी करवाढीच्या विरोधात आम्ही आवाज उठवू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर हा खळबळजनक खुलासा केला आहे. ‘जीएसटी’वर देशभरात असंतोष आहे. छोटय़ा उद्योजकांमध्ये जीएसटीबद्दल प्रचंड रोष असतानाही आता सरकार नवीन कररचना आणणार असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. त्यासाठी लोक काटकसर करून बचत करतात. मात्र गोरगरिबांच्या याच पैशांवर सरकारचा डोळा असून 1500 रुपयांवरील कपड्यांवर आता 12 टक्क्यांऐवजी 18 टक्के जीएसटी वसूल करण्यात येणार आहे. ही अन्यायकारक वाढ केवळ अब्जाधीशांचे कर्ज माफ करण्यासाठी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याविरोधात आम्ही आवाज उठवू, हा निर्णय बदलण्यासाठी आम्ही सरकारवर दबाव आणू, असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *