महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ डिसेंबर ।। अवघ्या बारा तासांत राज्यातील बहुतांश भाग थंडीने गारठला आहे. किमान तापमानात निम्म्याने घट झाली आहे. मंगळवारी जळगावचा पारा 8, नाशिक 9.4, तर पुणे शहराचे किमान तापमान 12.4 अंशांच्या खाली आले होते. थंडीची ही लाट 18 डिसेंबरपर्यंत राहणार आहे.
उत्तर भारतात पाकिस्तानातून पश्चिमी चक्रवात सक्रिय झाला असून, अवघा देश गारठण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर भारतातून महाराष्ट्रात शीत लहरी वेगाने दाखल झाल्याने दोन दिवस आधीच राज्य गारठण्यास सुरुवात झाली. प्रामुख्याने जळगावचा पारा मंगळवारी राज्यात सर्वांत कमी 8 अंशांच्या खाली आला. त्यापाठोपाठ नाशिक, अहिल्यानगर, पुणे शहरासह विदर्भातील नागपूर आणि परिसर गारठला आहे. थंडीची ही लाट 18 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
राज्याचे 24 तासांतील किमान तापमान
जळगाव 8, नाशिक 9.4, अहिल्यानगर 11.7, छ. संभाजीनगर 12.2, परभणी 12.5, महाबळेश्वर 13.2, अकोला 11.8, बुलढाणा 11.4, अमरावती 12.3, ब्रम्हपुरी 13.8, चंद्रपूर 12.5, गोंदिया 12.2, नागपूर 12, वाशिम 19.6, वर्धा 12.4, मुंबई (कुलाबा) 20.8, सांताक्रूझ 18, रत्नागिरी 21.1, कोल्हापूर 19.1, मालेगाव 16.8, सांगली 18.1, सातारा 15.8, सोलापूर 19.1, धाराशिव 16.3.