सलग सुट्टया आणि नाताळच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत विमान प्रवासात तिप्पट भाडेवाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ डिसेंबर ।। नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागताचे बेत आखण्यात येत आहेत. यासाठी विविध ठिकाणी फिरायला जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. यामुळे विमान प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे लक्षात घेऊन कंपन्यांनी विमानांच्या तिकीट दरात भरमसाट वाढ केली आहे. विविध मार्गावरील विमानांच्या तिकिटात तिपटीने वाढ झाली आहे.

मुंबई विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची दैनंदिन संख्या वाढली आहे. दिवसाला सुमारे एक हजार विमानांतून अंदाजे दीड ते पावणे दोन लाख प्रवासी ये-जा करीत आहेत. जोडून आलेल्या सुट्ट्या, दिवाळी, छट पूजा, उन्हाळी सुट्टी आणि आता नाताळच्या काळात पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये ६ ते १३ हजार रुपयांचे तिकीट १२ ते २७ हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. तीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनल एशिया-पॅसिफिक आणि मिडल इस्टद्वारे प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे निदर्शनास आले आहे की, २०२४ च्या पहिल्या सहामाहीत भारतातील देशांतर्गत विमान भाड्यात ४३% वाढ झाली आहे. २०१९ ते २०२४ या कालावधीत १९ देशांमधील ६ लाख मागाँवरील विमान भाड्याच्या ट्रेंडचे परीक्षण करून केलेल्या या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, व्हिएतनामनंतर भारतात ६३% दराने दुसऱ्या क्रमांकाची हवाई भाडेवाढ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *