महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ डिसेंबर ।। दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यात (Pune News) महापालिकेमार्फत पादचारी दिवस साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने पुण्यातील लक्ष्मी रस्ता आज सकाळी ८ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत वाहनांसाठी बंद ठेवला जाणार असून हा मार्ग केवळ पादचाऱ्यांसाठी खुला असणार आहे. तसेच लक्ष्मी रस्त्यावर नागरिकांच्या करमणुकीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. मात्र यावेळी वाहनांची कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गही उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. (Pune Pedestrian Day)
लक्ष्मी रस्त्यावर केली जाणार सजावट
पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्ता हा आकर्षक पद्धतीने सजविण्यात येणार आहे. या दिवशी जास्तीत जास्त नागरिकांनी लक्ष्मी रस्त्यावर यावे, यासाठी महा मेट्रोमार्फत कसबा आणि मंडई मेट्रो स्थानकापासून, पुणे मनपा मेट्रो स्थानकापासून खास सायकलीचे आयोजन करण्यात आले आहे. तर पीएमपीएलकडून जादा बससेवा पुरविण्यात येणार आहे. (Pedestrian Day)
पर्यायी मार्ग काय?
सेवा सदन चौक आणि उंबरया गणपती चौक ते गरुड गणपती चौक या ठिकाणी वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे.
बेलगाव चौकातून टिळक चौकाकडे येणारी वाहने सेवा सदन चौक-बाजीराव रोडकडे वळविण्यात येणार आहेत.
कुमठेकर रोडकडून लक्ष्मी रोडकडे जाणारी वाहने चितळे कॉर्नर-बाजीराव रोडकडे वळविण्यात येणार आहेत.
लोखंडे तालीम चौकातून कुठे चौकाकडे जाणारी वाहने केळकर रोड-टिळक रोडकडे वळविण्यात येणार आहेत.