महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ डिसेंबर ।। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज 85वा वाढदिवस आहे. जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान आज सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “आदरणीय श्री. शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा.” अशा शुभेच्छा अजित पवार यांनी एक्स पोस्टमधून दिल्या आहेत.