महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ डिसेंबर ।। राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर १० व्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. आज महायुतीच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधी सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीमधील कोणता आमदार मंत्री होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
महायुतीमधील भाजपचे जे आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत त्यांची नावं समोर आली आहेत. भाजपकडून २० आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या सर्व आमदारांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी फोन गेला आहे.
महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये भाजपकडे २१, शिवसेनेकडे १२ आाणि राष्ट्रवादीकडे १० खाती जाणार आहेत. भाजपचे कोण-कोण आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत ते आपण पाहणार आहोत…
मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या भाजपच्या आमदारांची नावं –
– चंद्रशेखर बावनकुळे
– आशिष शेलार
– नितेश राणे
– शिवेंद्रराजे भोसले
– चंद्रकांत पाटील
– पंकज भोयर
– मंगलप्रभात लोढा
– गिरीश महाजन
– जयकुमार रावल
– पंकजा मुंडे
– राधाकृष्ण विखे पाटील
– गणेश नाईक
– मेघना बोर्डीकर
– अतुल सावे
– माधुरी मिसाळ
– आकाश फुंडकर
– अशोक उइके
– संजय सावकार
– जयकुमार गोरे