महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ डिसेंबर ।। मंत्रिमंडळात मंत्रिपद हुकल्यान्य छगन भुजबळ नाराज असल्याचे पहायला मिळत आहे. अशातच त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य करत निशाणा साधला आहे. दुसऱ्यांना मंत्रिपद गेल्यामुळे याच्या पोटात दुखायला लागले आहे. यालाच पाहिजे सगळे. शरद पवारांनी दिले तेव्हा चांगले होते. पण ती राष्ट्रवादीही मोडली. त्यानंतर अजित पवारांनी मोठे केले. पद दिले. पण आता हा त्यांची राष्ट्रवादीही मोडायला निघाला असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर एकेरी उल्लेख करत जोरदार हल्लाबोल केला.
पुढे ते म्हणाले की, छगन भुजबळ हुशार आहेत. जेष्ठ आहेत. त्यांनीच सर्व व्हायला हवे. असा खोचक टोला त्यांनी लगावला. नाही मिळाले मंत्रिपद तर काय नाराज व्हायचे. भुजबळांनी एखादी होडी तयार करून आता समुद्रात मासेमारी करावी.
सोप काम करावे. जास्तच जर वेड्यावाणी करायला लागले तर ओबीसी नाराज आहे असे म्हणत राहिले आणि तेच ओबीसी फडणवीसांच्या अंगावर घातले तर तेच जेलमध्ये टाकतील. मग जेलमध्ये कांदे खात बसा. असा खोचक सल्लाही मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना दिला.