अश्विन आणि गंभीर यांच्यात ऑस्ट्रेलियामध्ये नेमकं काय घडलं ?अखेर समोर आलं निवृत्तीच कारण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ डिसेंबर ।। रवीचंद्रन अश्विनने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. अश्विनच्या वडिलांनी त्याचा संघात अपमान होत असल्याचे सांगितले आहे. पण ऑस्ट्रेलियात गेल्यावर अश्विन आणि गौतम गंभीर यांच्यात नेमकं काय घडलं, याबाबतची माहिती आता सूत्रांनी दिली आहे…

भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला. रोहित शर्मा त्यावेळी संघाबरोबर नव्हता. त्यामुळे जसप्रीत बुमराहला यावेळी कर्णधार करण्यात आले होते. पर्थच्या कसोटी सामन्यासाठी अश्विनकडून चांगलाच सराव करून घेतला होता. त्यामुळे या सामन्यात अश्विनला संधी मिळेल, असे सर्वांनाच वाटत होते. कारण अश्विनकडे ऑस्ट्रेलियामध्ये खेळण्याचा अनुभवही होता. पण गौतम गंभीर यांनी अश्विनला संधी न देता वॉशिंग्टन सुंदरला संघात स्थान दिले. त्यावेळीच गंभीर यांनी अश्विनला भवितव्याविषयी विचार करण्याचे संकेत दिले होते.

अश्विनला दुसऱ्या कसोटीत संधी मिळाली…
अश्विनला दुसऱ्या कसोटीतही संधी मिळाली नसती. पण रोहित शर्मा अश्विनसाठी आग्रही होता, असे आता समोर येत आहे. त्यामुळे अश्विनला दुसऱ्या कसोटीत संधी देण्यात आली. पण खेळपट्टी वेगवान गोलंदाजीला पोषक होती. त्यामुळे अश्विनला आपली छाप पाडता आली नाही. त्यामुळे जेव्हा तिसऱ्या कसोटी सामन्याचा विचार झाला तेव्हा अश्विन आणि सुंदर या दोघांनाही संधी न देता रवींद्र जडेजाला संघात स्थान देण्यात आले. अश्विनसाठी ही दुसरी निवृत्तीची घंटा होती.

अश्विनला गंभीर यांच्याकडून एक गोष्ट समजली…
ऑस्ट्रेलियात सिडनीची खेळपट्टी फिरकीला पोषक समजली जाते. त्यावेळी दोन फिरकीपटूंना भारतीय संघात स्थान मिळेल, असे निश्चित समजले जात होते. त्यामुळे या कसोटीची अशअविन वाट पाहत होता. पण त्यानंतर अश्विनला गंभीर यांच्याकडून स्पष्ट संकेत मिळाले की, दोन फिरकीपटू हे जडेजा आणि सुंदर हे असतील. त्यामुळे अश्विनला यानंतर कधीच संधी मिळणार नाही, हे समजून चुकले होते. संघात होणारा अपमान त्याला सहज झाला नाही आणि अश्विनने अखेर तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय घेत भारतात येणे पसंत केले. रोहितने अश्विनला थोडं थांबण्यास सांगितले होते. पण अश्विनला रोहितला वादात अडकवायचे नव्हते. त्यामुळे त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला आणि सर्वांनाच धक्का दिला.
Ravichandran Ashwin

अश्विनला गंभीर यांनी जे संकेत दिले, त्यामुळेच त्याने निवृत्तीचा अचानक निर्णय घेतला, अशी माहिती आता समोर येत आहे. त्यामुळे गंभीर यांनीच अश्विनची विकेट काढली, असे आता म्हटले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *