महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२१ डिसेंबर ।। बजाज ऑटोने भारतात नवीन चेतक 35 सीरीज लॉन्च केलीय. या नव्या स्कूटरचा लूक जुना जरी असला तरी फीचर्स मात्र दमदार देण्यात आले आहेत. नवीन चेतक आधीच्या स्कूटरपेक्षा अधिक प्रगत आणि स्मार्ट बनवण्यात आलीय. या स्कूटरमध्ये नवे आणि आवश्यक असणारे फीचर्स कंपनीने दिले आहेत. विशेष म्हणजे ही स्कूटर एका चार्ज केल्यानंतरही 100 पेक्षा जास्त किलोमीटर धावू शकते. ग्राहकांच्या दररोजचा वापर लक्षात घेता कंपनी ही स्कूटर बनवलीय. चला तर नव्या स्कूटरचे फीचर्स जाणून घेऊ.
नवीन चेतक 35 सिरीजमध्ये 3.5 kWh क्षमतेचा अंडरफ्लोर बॅटरी पॅक आहे. स्कूटरमध्ये बसवलेली बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर स्कूटर 153 किमीपर्यंत धावू शकते. तर स्कूटरची रिअल टाइम रेंज 125 किमी असल्याचा दावा बजाज ऑटोने केलाय. यात 950W ऑनबोर्ड चार्जरचीही सुविधा आहे. स्कूटरीच बॅटरी फक्त 3 तासात 80% पर्यंत चार्ज होते. ही स्कूटर सामान्य घरगुती पॉवर सॉकेटशी कनेक्ट करून सहजपणे चार्ज करते. यात इको आणि स्पोर्ट्स दोन्ही मोड आहेत.
वस्तू ठेवण्यासाठी 35 लिटरचं स्टोरेज
चेतक 35 सीरिजला पूर्णपणे नवीन पद्धतीने लॉन्च करण्यात आलीय. स्कूटरमध्ये वस्तू ठेवण्यासाठीही सुविधा देण्यात आलीय. स्कूटरच्या सीटखाली 35 लिटर क्षमतेचं अंडर-सीट स्टोरेज देण्यात आलंय. यात अत्यावश्यक वस्तूंव्यतिरिक्त तुम्ही बॅग किंवा हेल्मेट देखील ठेवू शकता. एवढेच नाही तर चार्जिंगसाठी वेगळा डबाही देण्यात आलाय. वस्तू ठेवण्यासाठी अनेक लहान-मोठे स्टोरेजही दिले आहेत.
फीचर्स आणि किंमत
नवीन चेतक इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये खूप चांगले फीचर्स देण्यात आले आहेत. नवीन स्कूटरमध्ये TFT टच स्क्रीन डिस्प्ले दिला गेलाय. जे इन्फोटेनमेंट सिस्टम आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दोन्ही म्हणून काम करते.
यात इंटिग्रेटेड मॅप, म्युझिक कंट्रोल, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कॉल ॲक्सेप्ट आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन यासारखे फीचर्स देण्यात आलेत. जसे की डॉक्युमेंट स्टोरेज, 35 लिटर बूट स्पेस, जिओ फेन्सिंग, थेफ्ट अलर्ट, अपघात अलर्ट, स्पीड अलर्ट अशी फीचर्स देण्यात आली आहेत.
नवीन बजाज चेतक 35 सीरिज एकूण दोन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आलीय. या स्कूटरच्या बेस व्हेरिएंट (3502) ची किंमत 1,20,00 रुपये आहे. तर टॉप व्हेरिएंटची (3501) किंमत 1,27,243 रुपये आहे. कंपनीने दोन्ही प्रकारांचे अधिकृत बुकिंग सुरू केलंय. ग्राहक अधिकृत वेबसाइटवरून स्कूटर बुक करू शकतात. मार्केटमध्ये Bajaj Chetak 35 सीरीजची स्पर्धा Ather Rizta, TVS iQube, Ampere Nexus और Ola S1 शी होणार आहे.