महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२२ डिसेंबर ।। शरद पवार यांनी आज पुण्याच्या भीमथडी जत्रेला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते देखील उपस्थित होते. पुण्यातील शिवाजीनगर मधील सिंचननगर येथील मैदानावर गेले दोन दिवसापासून भीमथडी जत्रा सुरू झाली आहे. यंदाचे हे भीमथडी जत्रेचे १८ वे वर्ष आहे. या जत्रेला भेट देत आज शरद पवार यांनी पाहणी केली. विशेष म्हणजे या ठिकाणाहून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून भीमथडीच्या जत्रेला येण्याचं निमंत्रण देखील दिलं आहे. तसंच बीड प्रकरणात लक्ष घालण्याचीही विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. या पाहणी दरम्यान शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, अप्पासाहेब पवार यांना ही जत्रा यावेळी समर्पित आहे. हे जत्रेचं १८ वं वर्षं आहे. जत्रेला राज्य आणि बाहेरून चांगला प्रतिसाद मिळत आहे. देशपातळीवर भीमथडी जात आहे याचा आनंद आहे.