शाळा केव्हा सुरु होणार? केंद्र सरकार गांभिर्याने विचार करत आहे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – नवीदिल्ली – दि. ११ ऑगस्ट – गेल्या काही महिन्यांपासून बंद पडलेल्या शाळा आता पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार त्यावर गांभिर्याने विचार करत आहे. 1 सप्टेंबरपासून टप्प्या टप्प्याने या शाळा सुरु होणार आहेत असं म्हटलं जात होतं मात्र त्यावर अजुन निर्णय झाला नसल्याची माहिती समोर आली आहे.

Unlock-3ची मुदत 31 ऑगस्टला संपणार आहे. त्यानंतर नव्या गाईड लाईन्समध्ये यासंबंधी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाशी संबंधित संसदेच्या स्थायी समितीची बैठक आज दिल्लीत झाली. खासदार विनय सहस्त्रबुद्धे हे समितीचे अध्यक्ष आहेत. त्यात सर्व परिस्थितीचा आढाव घेण्यात आलामात्र शाळा सुरु होण्यासारखी परिस्थिती नसल्याचं मत सगळ्यांनीच व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे नेमका काय निर्णय घ्यायचा यावर सध्या विचार मंथन सुरु आहे.

शाळा सुरु होण्यासंदर्भात सोमवारी WHOनेही सर्वच देशांना इशारा दिला होता. त्यामुळे सगळ्यांचीच चिंता वाढली आहे.शाळा सुरु व्हावी असं सळ्यांनाच वाटतं मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.या आधी केंद्र सरकारने Online शाळांबाबात गाईडलाईन्स जारी केल्या होत्या. त्यामध्ये कुठल्या वर्गाचा किती वेळ क्लास घ्यावा त्याबाबत सांगितलं होतं.देशातली सध्याची स्थिती पाहता राज्यांनी आपल्या भागतली स्थिती बघूनच निर्णय घ्यावा असं मत केंद्र सरकारचं असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *