सर्वात जलद 200 बळी घेणारा भारतीय गोलंदाज बनला बुमराह

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२९ डिसेंबर ।। भारतीय क्रिकेट संघाचा सुपरस्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने इतिहास रचला आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये विकेट्सचे द्विशतक पूर्ण केले. बुमराहने मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या डावात कांगारूंचा अव्वल फलंदाज ट्रॅव्हिस हेडला बाद करून ही खास कामगिरी नोंदवली. कसोटी क्रिकेटच्या 148 वर्षांच्या इतिहासात कोणत्याही गोलंदाजाला जे जमले नाही ते भारतीय गोलंदाजाने केले आहे. कसोटीत 20 पेक्षा कमी सरासरीने 200 बळी घेणारा बुमराह हा जगातील पहिला गोलंदाज बनला आहे.

बॉक्सिंग डे कसोटीच्या चौथ्या दिवशी सॅम कॉस्टन्सच्या रूपात भारताची पहिली विकेट मिळवणाऱ्या या गोलंदाजाने फॉर्मात असलेल्या ट्रॅव्हिस हेडला बाद करून विश्वविक्रम रचला. त्याला पहिल्या डावात खाते न उघडता पाठवले होते तर आता दुसऱ्या डावात केवळ एक धावेवर हेडला तंबूचा रस्ता दाखवला.

कसोटीत ‘अशी’ कामगिरी करणारा पहिला गोलंदाज
बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात दुसरी विकेट घेत या फॉरमॅटमधील विकेट्सचे द्विशतक पूर्ण केले. 200 किंवा त्याहून अधिक बळी घेतलेल्या जगातील कोणत्याही गोलंदाजाने 20 पेक्षा कमी सरासरीने विकेट घेतलेल्या नाहीत. पण बुमराह 19च्या सरासरीने विकेट्स घेऊन पराक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. वेस्ट इंडिजच्या माल्कम मार्शलने 376 विकेट घेतल्या असून त्याची सरासरी 20.94 आहे.

बुमराहचा कसोटी विक्रम
बुमराहने कारकिर्दीतील केवळ 44वी कसोटी खेळताना 200 बळी घेण्यासाठी प्रत्येक विकेटवर 20 पेक्षा कमी धावा दिल्या आहेत. माल्कम मार्शल हा सर्वात कंजूष गोलंदाज मानला जात असे परंतु त्याने प्रति विकेट 20 पेक्षा जास्त धावा दिल्या आहेत. वेस्ट इंडिजचा आणखी एक महान गोलंदाज जोएल गार्नर याने 58 कसोटी सामन्यांमध्ये 20.97 च्या सरासरीने 259 बळी घेतले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *