Walmik Karad : वाल्मिक कराड पुण्यात सरेंडर करणार, सीआयडी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.३१ डिसेंबर ।। बीडमधील खंडणी प्रकरणातील फरार आरोपी वाल्मीक कराड सीआयडी ऑफिसमध्ये सरेंडर करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज ११ वाजता वाल्मीक कराड पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये सरेंडकर करणार आहे. मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील कायदा सुव्यस्था राज्यात चर्चेचा विषय झाली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात वाल्मीक कराड यांचे नाव समोर आले होते.

संतोष देशमुख हत्या प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आल्यानंतर तपासाला वेग आला. त्यांनी वाल्मीक कराड याच्या निकटवर्ती लोकांची कसून चौकशी केली. त्याशिवाय पासपोर्ट रद्द करण्याची सरकारकडे मागणी केली. देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर वाल्मीक कराड यांची सर्व बँक खाती फ्रीज करण्यात आली.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड तीन आठवड्यांपासून फरार आहे. आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. त्यामध्ये वाल्मीक कराड याचेही नाव आहे. वाल्मीक कराड याचा शोध सीआयडीकडून घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कराड आज ११ वाजता सरेंडर करणार आहे. वाल्मीक कराडचे अनेक कार्यकर्ते सीआयडीच्या कार्यालयाबाहेर दाखल झाले आहेत.

आम्ही सीआयडीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत. वाल्मीक कराड हे आरोपी नाहीत. ते खंडणीचा त्यांच्यावर खोटा आरोप, गुन्हा दाखल केला असल्याचे समर्थकांचे म्हणणं आहे. बीड आणि अहमदनगरवरून आलेल्या समर्थकांनी सीआयडी कार्यालयाबाहेर गर्दी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *