राज्य सरकारचा मोठा निर्णय, संतोष देशमुख हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ जानेवारी।। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी राज्य सरकारने तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरू असून आतापर्यंत दीडशेपेक्षा जास्त जणांची चौकशी करण्यात आलीय. तर खंडणी प्रकरणी वाल्मीक कराडला अटक करण्यात आली आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयपीएस बसवराज तेली, पोलीस उपमहानिरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा, सीआयडी पुणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन केलं आहे.

पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखालील या विशेष तपास पथकात पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर, सपोनि विजयसिंग जोनवाल, पीएसआय महेश विघ्ने आणि पीएसआय आनंद शंकर शिंदे, सहाय्यक पीएसआय तुळशीराम जगताप यांच्याशिवाय इतर पोलीस कर्मचारी आहेत.

संतोष देशमुख यांच्या प्रकरणात हत्येसह चार गुन्हे दाखल कऱण्यात आले आहेत. यात अपहरण आणि हत्या, दोन कोटी रुपयांची खंडणी, एट्रॉसिटी आणि मारहाण अशा चार गुन्ह्यांची नोंद आहे. या चार गुन्ह्यात पाच जणांना पोलिसांनी अटक केलीय. मंगळवारी खंडणी प्रकरणातील आऱोपी वाल्मीक कराड हा पुण्यात सीआयडी ऑफिसमध्ये शरण आळा. त्याच्याशिवाय चार गुन्ह्यात ९ संशियत आहेत. यापैकी चार जण अद्याप फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *