Pandharpur Temple : नववर्षानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात फळांची आकर्षक सजावट!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ जानेवारी।। नववर्षानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात फळांनी सजावट करण्यात आली आहे. इंग्रजी नववर्ष २०२५ ची सुरुवात झाली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला हजारो भाविक आपापल्या आराध्य देवतेच्या दर्शनाला जात असतात. पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातही नवीन वर्षाच्या निमित्ताने भाविकांची रिघ पाहायला मिळत आहे.


नववर्षानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात फळांनी सजावट करण्यात आली आहे.वर्षभर विविध शुभ दिनी तसेच विशेष दिवशी पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात अशाच पद्धतीने आकर्षक आरास केली जाते.पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेण्याची अनेकांची इच्छा असते. तर काही जण नित्यनेमाने दरवर्षी पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन घेत असतात.

https://www.instagram.com/vitthalrukminimandir_official/?utm_source=ig_embed&ig_rid=ec1f4114-bbcc-4d0f-ba3f-7348b9f40edf

आषाढी आणि कार्तिकी वारी हा तर वारकरी आणि भाविकांसाठी अद्भूत आनंदाचा दिव्य सोहळा असतो. वारी करणे शक्य नाही, ते वर्षातून एकदा पंढरपूरला जाऊन विठ्ठल-रुक्मिणी मातेचे आवर्जून दर्शन घेतात.विठ्ठल नामाच्या गजराने विठ्ठल मंदिर आणि परिसर दणाणून जातो. विठ्ठल नामात तल्लीन भाविकांचा उत्साह आणि आनंद पाहण्यासारखा असतो. नववर्षानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात फळांनी केलेली सजावट अतिशय देखणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *