महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ जानेवारी।। कन्याकुमारीतील समुद्रकाठावर देशातील पहिला काचेचा पूल बांधून पूर्ण झाला. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटनानंतर थिरुवल्लूवर यांच्या पुतळ्यावर लेसर लाईट शो झाला. हा पूल विवेकानंद स्मारकाला तिरुवल्लूवर पुतळ्याशी जोडतो. पर्यटकांना आता पुलावरून पुतळ्यापर्यंत पोहोचता येईल. काचेच्या पुलाखाली समुद्र आहे. पुलावरून चालताना आपण समुद्रावर चालत आहोत, असा भास होतो, असे एका पर्यटकाने सांगितले.
आकडे बोलतात…
2,000 वर्षांपूर्वी थिरुवल्लूवर हे संत होऊन गेले.
1,330 पदे संत थिरुवल्लूवर यांनी लिहिली.
133 फूट उंचीचा त्यांचा पुतळा समुद्रकाठी उभारलेला आहे.
1 जानेवारी 2000 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री करुणानिधी यांनी त्याचे उद्घाटन केले.
25 वर्षे पुतळ्याला पूर्ण झाल्याबद्दल काचेच्या पुलाचा उपक्रम राबवण्यात आला.
1970 मध्ये विवेकानंदांचे स्मारक बांधले गेले.
2 आकर्षणांना जोडण्यासाठी हा पूल बांधण्यात आला.
77 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद हा पूल आहे.
37 कोटी रुपये राज्य सरकारने
या पुलावर खर्च केले आहेत.