महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ जानेवारी।। जर तुम्ही ऑनलाइन वस्तू खरेदी करण्यासाठी ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर रिव्ह्यू वाचत असाल आणि त्या आधारे वस्तू खरेदी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. दरम्यान, आता स्कॅमर्स निरनिराळ्या मार्गांचा वापर करत आहे. यालाच ब्रशिंग स्कॅम म्हटलं जात आहे. ऑनलाइन स्कॅमर्स लोकांना अशी पॅकेजेस पाठवतात, ज्यात स्वस्त गॅजेट्स किंवा कोणतीही छोटी वस्तू असते, जी त्यांनी ऑर्डर केलेलीही नाही.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की स्कॅमर्स असं का करत आहेत. खरं तर, ते फेक रिव्ह्यू लिहिणं आणि आपले प्रोडक्ट चांगले असल्याचं दाखवण्यासाठी असं करतात. मग भलेही ते कमी गुणवत्तेचे असतील किंवा बनवाटही असतील, तरी हे केलं जातं. मॅकेफीनं एका ब्लॉग पोस्टमध्ये स्कॅमर्सला कृत्रिमरित्या विक्री आणि व्यवहार्यता वाढवायची असल्याचं म्हटलं आहे.
ब्रशिंग हा शब्द चिनी ई-कॉमर्समधून आला आहे, जिथे बनावट ऑर्डर तयार केली जाते आणि विक्रीची संख्या ब्रश अप करण्यासाठी बनावट ऑर्डर तयार केली जाते. यामुळे उत्पादनाची कथित लोकप्रियता वाढते आणि खरेदीदारांना उत्पादन उच्च गुणवत्तेचं आहे असं वाटतं. त्यामुळे त्याची विक्री वाढते.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, हा एक प्रकारचा फ्रॉड आहे ज्यामध्ये विक्रेते लोकांना त्यांच्या परवानगीशिवाय पॅकेज पाठवतात. या पॅकेजेसमध्ये सहसा ऑर्नामेंट्स किंवा रॅंडम गॅजेट्स सारख्या स्वस्त आणि कमी गुणवत्तेच्या वस्तू असतात. स्कॅमर्स पॅकेजेस पाठविण्यासाठी अनेकदा बनावट किंवा चोरलेल्या पत्त्यांचा वापर करतात. एकदा वस्तूची डिलिव्हरी झाली की, उत्पादन चांगलं दिसावं आणि विक्रेत्याचे रेटिंग वाढावे यासाठी ते बनावट रिव्ह्यू लिहितात.
कसा होतो स्कॅम? स्कॅमर्स इ प्लॅटफॉर्मवर बनवाट अकाऊंट तयार करतात. तो आपले प्रोडक्ट स्वत:च ऑर्डर करतात आणि त्या चोरून मिळवलेल्या पत्त्यावर तो प्रोडक्ट पाठवतात. कोणत्याही रँडम व्यक्तीला कमी दर्जाचा प्रोडक्ट किंवा खराब क्वालिटीचं इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस पाठवण्यात येतं.
जसं पॅकेज डिलिव्हर होतं, स्कॅमर त्या प्रोडक्टबाबत चांगला रिव्ह्यू लिहितात आणि त्यासाठी ज्यांच्याकडे प्रोडक्ट ऑर्डर केला आहे त्यांच्याच नावाचा वापर करतात. हे स्कॅमर्स आपलं रँकिंग वाढवण्यासाठी कॉस्टुम ज्वेलरी, बीज किंवा स्वस्त गॅजेट पाठवतात. जर तुम्हाला कोणतंही असं पॅकेज मिळालं तर, ते ब्रशिंग फ्रॉडचाच पार्ट असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जर तुम्हाला असं पॅकेज मिळालं जे तुम्ही ऑर्डर केलं नसेल, तर याचा अर्थ तुमची माहिती चोरली गेली आहे, असाही होऊ शकतो. स्कॅमर्स कायम डेटा ब्रीचच्या माध्यमातून नाव आणि अॅ़ड्रेस मिळवतात किंवा अवैधरित्या माहिती विकत घेतात.