महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ जानेवारी।। कमी पैशांत कोकण वारी करायची असेल तर, ट्रेनचा प्रवास करा. कोकणात सर्व ठिकाणी फिरताना बसचा वापर करा.यामुळे प्रवास खर्च वाचेल.
कधी भेट द्याल?
कोकण ट्रिप प्लान करायची असेल तर ऑफ सीझनला फिरायला जा. म्हणजे राहण्याची आणि खाण्याची सोय कमी पैशांत होईल.
ऑनलाइन बुकिंग
तुम्ही मुंबईहून ऑनलाइन हॉटेल बुक करू शकता. मात्र एक काळजी घ्या तुमच्या जवळच्या फिरण्याच्या ठिकाणचे हॉटेल बुक करा. म्हणजे प्रवास खर्च वाचेल.
ट्रिपचे नियोजन
पूर्ण ट्रिपचे आधीच नियोजन करून जा. म्हणजे नंतर गडबड होणार नाही आणि जास्तीचे पैसे लागणार नाही. कोकणातील पाच महत्त्वाची ठिकाणे जाणून घ्या.
गणपतीपुळे मंदिर
कोकणात गणपतीपुळे मंदिर हे सर्वात मोठे श्रद्धा स्थान आहे. हे इच्छापूती मंदिर असून चहूबाजूंनी पाण्याने वेढले आहे.
श्रीवर्धन बीच
कोकणातील श्रीवर्धन समुद्रकिनारा पर्यटकांचे आकर्षण आहे. येथे तुम्ही कुटुंबासोबत फिरायला येऊ शकता.
वेळणेश्वर शिवमंदिर
कोकणातील वेळणेश्वर शिवमंदिर हे अत्यंत सुंदर आणि प्राचीन देव स्थान आहे. कोकणातील पर्यटनाचे हे केंद्र स्थान आहे.
थिबा राजवाडा
समुद्रकिनाऱ्या व्यतिरिक्त कोकणात फिरायचे असेल तर थिबा राजवाडा बेस्ट ठिकाण आहे. हा राजवाडा पुरातन गोष्टींसाठी खूप प्रसिद्ध आहे.
कशेळी
रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळी गाव कोकणात खूप प्रसिद्ध आहे. येथे मोठा बीच आहे. तसेच प्रसिद्ध मंदिरे देखील आहेत.