रोहित शर्मा सिडनी कसोटीत खेळणार की नाही? महत्त्वाची अपडेट समोर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ जानेवारी।। रोहित शर्माने अखेर पाचव्या कसोटीत खेळायचे की नाही, याबाबतचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता रोहित सिडनी कसोटीत खेळणार की नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

रोहित शर्मा पाचव्या कसोटीत खेळणार की नाही, याची जोरदार चर्चा सुरु होती. कारण रोहित शर्मा हा एक फलंदाज म्हणून तर अपयशी ठरत होता आणि एक कर्णधार म्हणूनही त्याला ऑस्ट्रेलियात एकही विजय मिळवता आला नव्हता. त्यामुळे रोहित शर्मावर दडपन वाढत चालले होते आणि त्याच्या निवृत्तीची चर्चा व्हायला लागली होती.

भारतासाठी सिडनी कसोटी करो या मरो, अशीच असणार आहे. कारण ऑस्ट्रेलिया मालिकेत २-१ अशी आघाडीवर आहे. त्यामुळे आता भारताने जर या सिडनी कसोटीत विजय मिळवला तरच त्यांना मालिकेत ऑस्ट्रेलियाशी बरोबरी करता येणार आहे. त्याचबरोबर भारताने विजय साकारला तरच त्यांचे WTC Final मधील आव्हान कायम राहणार आहे. त्यामुळे ही कसोटी भारतासाठी निर्णायक अशीच ठरणार आहे. या महत्वाच्या कसोसाठी रोहित शर्माने आता एक मोठा निर्णय घेतला आहे.

रोहित शर्माने पाचव्या आणि निर्णायक कसोटीसाठी आता विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. कारण एकिकडे रोहित शर्मावर निवृत्ती घेण्याचे दडपण वाढत आहे. त्यामुळे रोहित शर्माला सिडनी कसोटीबाबत महत्वाचा निर्णय घेणे भाग होते. त्यामुळे रोहितने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. विश्रांती घेतल्यामुळे आता रोहित शर्माला निवृत्ती घ्यावी लागणार नाही. कारण यानंतरच्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा खेळू शकतो. त्यामुळे फक्त सिडनी येथे होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यात रोहित खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आा सिडनी कसोटी सामन्यात रोहितच्या जागी कोणाकडे भारताचे नेतृत्व देणार, याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही.

रोहित शर्माने आता पाचव्या कसोटीबाबतचा निर्णय घेताना सावध पाऊल उचलले आहे. रोहित शर्माने निवृत्ती घेतलेली नाही, तर त्याने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे रोहित शर्मा यापुढेही कसोटी क्रिकेट खेळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *