Hyundai Creta EV: ह्युंदाईची क्रेटा ईलेक्ट्रीक आली; पाहून घ्या रेंज, फिचर्स…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ जानेवारी।। देशातील सर्वाधिक पसंतीची मिड साईज एसयुव्ही असलेल्या ह्युंदाई क्रेटाचे ईव्ही व्हर्जन भारतीय बाजारपेठेत येण्यास तयार झाले आहे. या ईलेक्ट्रीक क्रेटावरून आज पडदा हटविण्यात आला आहे. १७ जानेवारीला दिल्लीत होत असलेल्या ऑटो एक्स्पोमध्ये ही कार लाँच केली जाणार आहे. परंतू, त्यापूर्वी आज या कारची रेंज आणि फिचर्स दाखविण्यात आले आहेत.

ह्युंदाईने आज क्रेटा ईव्ही दाखविली आहे. या कारची किंमत ऑटो एक्स्पोमध्ये समजणार आहे. ह्युंदाईकडे आयोनिक, कोना सारख्या ईलेक्ट्रीक कार आहेत. परंतू, त्या खूप महागड्या असून भारतीयांच्या पसंतीसही उतरलेल्या नाहीत. यामुळे ह्युंदाईने टाटा नेक्सॉन, एमजी झेड्एसला टक्कर देण्यासाठी क्रेटाचे ईलेक्ट्रीक व्हर्जन आणण्याचा निर्णय घेतला आहे.

Hyundai Creta EV एक्झिक्युटिव्ह, स्मार्ट, प्रीमियम आणि एक्सलन्स सारख्या 4 ट्रिम पर्यायांमध्ये उपलब्ध होणार आहे. 3 मॅट रंगांसह 8 मोनोटोन आणि 2 ड्युअल-टोन रंग देण्यात येणार आहेत. क्रेटा इलेक्ट्रिक दोन बॅटरी पॅक पर्यायांमध्ये येईल, ज्यामध्ये 51.4 kWh बॅटरी पॅकची सिंगल चार्ज रेंज 473 किलोमीटरपर्यंत असेल आणि 42 kWh बॅटरी पॅकची सिंगल चार्ज रेंज 390 किलोमीटरपर्यंत असणार आहे.

यामध्ये डिजीटल की, लेव्हल 2 ADAS, TPMS, 360-डिग्री कॅमेरा यासह सुरक्षा वैशिष्ट्ये असण्याची शक्यता आहे. चार्जिंग पर्यायांमध्ये DC चार्जरचा समावेश आहे जो फक्त 58 मिनिटांत 10% ते 80% पर्यंत बॅटरी चार्ज करू शकतो. 11kW स्मार्ट कनेक्टेड वॉल बॉक्स चार्जर 4 तासात 10%-100% पर्यंत बॅटरी चार्ज करू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *