Gold Silver Price: सोने-चांदीचा आजचा भाव किती?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ जानेवारी।। मागील वर्षाने (२०२४) सोने आणि चांदीच्या खरेदी करणाऱ्‍या ग्राहकांना सुवर्ण धक्के दिले. सोन्याच्या दरवाढीने गुंतवणूकदारांची चांदी चांदी झालेली पाहायला मिळाली. सोन्या-चांदीवरील सीमा शुल्क कमी केल्याने मागील वर्ष सोन्या -चांदीने गोजवले. सीमा शुल्काच्या कपातीनंतर काही दिवसांतच सोन्याने आणि चांदीने नंतर पुन्हा उसळी मारली. गेल्या वर्षी सोन्याची किंमत ८१ हजारांवर उसळली तर चांदीने देखील एक लाख पार मजल मारली. नवीन वर्षात सोने आणि चांदीचे दर काय दिवे लावतात याकडे ग्राहकांचे लक्ष लागून आहे.

सोने-चांदीचा दर
नवीन वर्षाची सुरुवात होऊन अगदी दुसरा दिवस असताना सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवली गेली आहे. MCX वर, फेब्रुवारी सोन्याचा वायदा सकाळी ११.०० वाजता ५३३ रुपयांच्या वाढीसह ७६,७९३ रुपयांवर पोहोचला, जो शेवटच्या सत्रात रु. ७६, २६० वर क्लोज झाला आणि आज रु. ७६,३५३ वर उघडला. सोन्यापाठोपाठ चांदीही ९०,५०० रुपये प्रति किलोने महागले आहे पण सध्या उच्चांकी किंमतीवरून चांदी प्रचंड स्वस्त झाली आहे.

देशांतर्गत सराफा बाजारातील सोन्याची किंमत
या काळात, देशांतर्गत सराफा बाजारातही आता नववर्षातही सोन्याचे भाव वधारलेले दिसत आहे. २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत ३३० रुपयांनी वाढ झाली असून किंमत ही ७८,३३० रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव हा ७१,८०० रुपये तर त्याचवेळी, भारतीय ग्राहकांना आज चांदी ९०,५०० रुपये प्रति किलोग्रॅम या दराने उपलब्ध आहे.

२२ कॅरेट सोन्याचा आजचा दर
शहर आजचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम) कालचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
मुंबई ७१,८०० रुपये ७१,५०० रुपये
पुणे ७१,८०० रुपये ७१,५०० रुपये
नागपूर ७१,८०० रुपये ७१,५०० रुपये
कोल्हापूर ७१,८०० रुपये ७१,५०० रुपये
जळगाव ७१,८०० रुपये ७१,५०० रुपये
ठाणे ७१,८०० रुपये ७१,५०० रुपये

२४ कॅरेट सोन्याचा आजचा दर
शहर आजचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम) कालचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
मुंबई ७८,३३० रुपये ७८,००० रुपये
पुणे ७८,३३० रुपये ७८,००० रुपये
नागपूर ७८,३३० रुपये ७८,००० रुपये
कोल्हापूर ७८,३३० रुपये ७८,००० रुपये
जळगाव ७८,३३० रुपये ७८,००० रुपये
ठाणे ७८,३३० रुपये ७८,००० रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *