महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.४ जानेवारी।। महाकुंभ मेळा १३ जानेवारीला सुरू होणार असून २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या मेळ्यात देश-विदेशातून भाविक मोठ्या प्रमाणात येतात. हिंदू धर्मात महाकुंभ मेळ्याला खास महत्व आहे. महाकुंभ मेळा १२ वर्षांनी आयोजित केला जातो. या मेळ्यात जाताना काही छोट्या पण उपयुक्त गोष्टी बॅगमध्ये ठेवल्या पाहिजेत.ज्यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.
स्नॅक्स
कुंभमेळ्यात मेळ्यात जाताना बॅगमध्ये हलके फुलके स्नॅक्स सोबत ठेवावे. कारण मेळ्यात खुप जास्त गर्दी असते. ज्यामुळे तुम्हाला खाद्यपदार्थांसाठी शोधाशोध करावी लागू शकते. यामुळे बॅगमध्ये सुकामेवा, शेंगदाणे यासारखे स्नॅक्स बॅगमध्ये ठेवावे.
पाणी बॉटल
महाकुंभ मेळ्यात गर्दीमुळे अनेकांना डिहायड्रेशन होऊ शकते. अशावेळी बॅगमध्ये पाण्याची बाटली ठेवणे गरजेचे आहे. तसेच तुम्ही फळांचा रस देखील ठेऊ शकता. यामुळे पाण्याची शोधाशोध करावी लागणार नाही. तुम्ही बॅगमद्ये छोटी पाणी बॉटल नक्कीच ठेवली पाहिजे.
आधार-पॅन कार्ड
तुम्ही तुमच्या बॅगेत आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स ठेवणेआवश्यक आहे. तुमच्या ओळखपत्राच्या मदतीने तुम्हाला गर्दीच्या ठिकाणी काही अडचण जाणवल्यास तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना माहिती देऊ शकता.
सॅनिटायझर
सॅनिटायझर, पेपर सोप, हँड टॉवेल यांसारख्या स्वच्छतेच्या वस्तू तुम्ही तुमच्या बॅगमध्ये ठेवाव्यात. अशा गोष्टींची कधीही गरज भासू शकते. या व्यतिरिक्त, तुम्ही एक लहान प्राथमिक उपचार किट आणि काही सामान्य औषधे देखील ठेवावी. जेणेकरून तुमची तब्येत बिघडल्यास तुम्हाला उपयोगी पडेल.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.