महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। मंगेश खंडाळे ।। दि. ५ जानेवारी।। श्रीगोंदा तालुक्यामध्ये रामदास शंकर ससाने यांची दगडफेक करून हत्या करण्यात आली कित्येक दिवस उलटूनही आरोपींच्या विरोधात कठोर कलम दाखल व्हावे या मागणीसाठी अहिल्यानगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक व अहिल्यानगर शहरचे डीवायएसपी या दोन्ही अधिकाऱ्यांस सकल हिंदू समाजातर्फे निवेदन देण्यात आले,पीडित मृत्युमुखी पडलेल्या रामदास शंकर ससाणे यांस न्याय मिळावा यासाठी 4 जानेवारी 2025 रोजी अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर निदर्शने करण्यात आली.
मोर्चात यांचा प्रामुख्याने सहभाग
यावेळी स्थानिक आमदार संग्राम जगताप, पतित पावन संघटनेचे स्वप्निल नाईक, मातंग समाज पुणे शहर जिल्हा स्वागत अध्यक्ष श्री सदा ढावरे, क्रांतिवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री मनोज आप्पा शिरसागर, श्री राजाभाऊ देडे, सौ सविता ताई खवळे, श्री अक्षय ढावरे,श्री सनी साळवे, श्री बाळासाहेब जाधव, श्री विजय पठारे, श्री शिवम घोलप, श्री महेश चिंतामणी, श्री केदार रासकर, श्री भागवत कुरधने, श्री अमित सरोदे, व महाराष्ट्रातून आलेले सर्व पदाधिकारी उपस्थित होते.