महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ जानेवारी ।। भारतीय संघातील वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आपल्या स्विंग आणि वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. तो सध्या इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या काऊंटी क्रिकेट लीग स्पर्धेत खेळतोय. या स्पर्धेत त्याच्या गोलंदाजीचा कहर पाहायला मिळाला आहे.
काऊंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याने गोलंदाजी करताना इनस्विंग गोलंदाजी करुन त्याने फलंदाजाची दांडी गुल केली, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग नव्या चेंडूने स्विंग करण्यासाठी ओळखला जातो. सुरुवातीच्या षटकांमध्ये तो ब्रेकथ्रू मिळवून देण्यासाठी ओळखला जातो. भारताच्या वनडे आणि टी-२० संघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अर्शदीपला अजूनही कसोटी संघात पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही. मात्र काऊंटी क्रिकेटमध्ये त्याच्या गोलंदाजीचा जलवा पाहायला मिळाला आहे.
Beautiful swing from Arshdeep Singh pic.twitter.com/hhFX2WzHlz
— Rothesay County Championship (@CountyChamp) January 7, 2025
नजर हटी दुर्घटना घटी
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी गोलंदाजीला येतो. तर डावखुऱ्या हाताचा फलंदाज स्ट्राईकवर असतो.
अर्शदीप सिंगने टाकलेला चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर पडतो आणि टप्पा पडचात काटा बदलून आत येतो आणि फलंदाजाची मधली यष्टी उधळून जातो. अर्शदीप सिंगने टाकलेला हा शानदार चेंडू पाहून समालोचकही शॉक होतात. यष्ट्या उधळताच ते अर्शदीप सिंगचे कौतुक करु लागतात.
अर्शदीप सिंगचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर,एकच प्रश्न उपस्थित केला जातोय, की, अर्शदीप सिंगला बॉर्डर- गावसकर ट्रॉफीसाठी संघात स्थान का दिलं गेलं नाही. ऑस्ट्रेलियात वेगवान गोलंदाजांना चांगलाच स्विंग मिळतो आणि चेंडूला उसळीही मिळते.
मात्र या मालिकेसाठी अर्शदीप सिंगला संधी दिली गेली नव्हती. अर्शदीप वनडे आणि टी-२० क्रिकेट खेळतो, मात्र त्याला अजूनही कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी देण्यात आलेली नाही.