महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ जानेवारी ।। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलेल्या या निर्णयाचा परिणाम संपूर्ण राज्यात होणार असून शेतकऱ्यांनाही यामधून फायदा होणार आहे. ते कसं पाहूयात…यापुढे राज्यातून कुठल्याही भागातील संतप्तीचं रजिट्रेशन करता येणार. राज्यातील कोणत्याही भागातील नागरिकास राज्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करता येणार. फेसलेस प्रणाली राबवणार असल्याने घर खरेदीदरम्यान फायदा होणार आहे. या नव्या योजनेमुळे घर खरेदी करताना रजिस्ट्रेशन म्हणजेच दस्त नोंदणी अधिक सहज करता येणार आहे.घरबसल्या करता येणार नोंदी!
राज्यभरात जीआयएस ई प्रणालीने करणार जमीन मोजणी.भू-प्रमाण केंद्र स्थापन करणार भूसंपादन प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. यामुळेही प्रकल्पामध्ये जमीन द्यावी लागणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.वाळू धोरण तयार केलं जाणार.त्या शेतकऱ्यांचं ओळखपत्र तयार केलं जाणार.