David Warner ची बॅट तुटली अन् स्वत:च्याच डोक्याला लागली ; Video

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० जानेवारी ।। ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या बीग बॅश लीगमध्ये सिडनी थंडरचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने तुफान फटकेबाजी केली. होबार्ट हरिकेन्स विरूद्धच्या सामन्यात वॉर्नरने ६६ चेंडूत ८८ धावांची नाबाद खेळी केली. कर्णधाराने एकहाती संघाचा भार सांभाळत २० षटकांत संघासाठी १६४ धावांचा टप्पा गाठला. या सामन्यात एक विनोदी किस्सा घडला.

लेग साईडला फटका खेळण्याच्या प्रयत्नात असाताना कर्णधार डेव्हिड वॉर्नरची बॅट तुटली आणि त्याच्या हेल्मेटवर आदळली. वॉर्नरच्या बॅट ब्रेकिंगचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रथम फलंदाजी करताना सिडनी थंडर्सने डावात ६ विकेट्स गमावत १६४ धावा उभारल्या. ज्यामध्ये कर्णधार डेव्हिड वॉर्नरने मोठी खेळी केली. सलामीवीर सॅम कॉन्स्टास ४ धावांवर बाद झाला आणि थंडर्सला सामन्यात पहिला धक्का बसला. त्यानंतर ४२ धावांवर मॅथ्यू गिल्सच्या रूपाने थंडर्सचा दुसरा फलंदाज माघारी परतला. त्यानंतर ऑलिव्हर डेव्हिसने वॉर्नरला १७ धावांची साथ दिली.

सॅम बिलिंग्ससोबत वॉर्ननेसोबत ३४ धावांची भागिदारी केली. १५.४ षटकांत बिलिंग्स बाद झाला आणि त्यांची भागीदारी तुटली. त्यानंतर थंडर्सचा डाव घसरला. पण वॉर्नरने ७ चौकारांच्या मदतीने ६६ चेंडूत ८८ धावांची खेळी केली आणि होबार्ट हरिकेन्स संघासमोर विजयासाठी १६५ धावांचे लक्ष्य ठेवले.

होबार्ट हरिकेन्स संघाने १६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ७.३ व्या षटकात ६४ धावांवर ३ विकेट्स गमावले आहेत. ज्यामध्ये मिचेल ओवेन (१३), मॅथ्थ्यू वेड (१३), चार्ली वाकिम (१६) धावा केल्या. सध्या निखील चौधरी १८ व टीम डेव्हिड २ धावांवर नाबद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *