![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ जानेवारी ।। सध्या सर्वत्र महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. महागाईचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसत आहे. दरम्यान, आता चाकरमान्यांनाही महागाईचा फटका बसणार आहे. आता पोळी-भाजीच्या किंमतीदेखीव वाढल्या आहेत. भाज्यांचे दर वाढल्याने हा निर्णय घेण्यात आले आहे.
सर्वत्र महागाई वाढलेली असताना आता या महागाईची झळ पोळी-भाजीलाही बसली आहे. बदलापूरात पोळी 1 रुपयाने, भाकरी 2 रुपयाने तर भाजी 5 रुपयाने महागली आहे. किराणा सामान, गॅस महागल्याने पोळी-भाजी केंद्र चालकांनी दरवाढीचा निर्णय घेतलाय. (Bhaji Poli Price Hike)
काही दिवसांपूर्वीच बदलापुरातल्या बेकरी चालकांनी पावाच्या दरात वाढ केली होती. त्यानंतर वडापावही एक रुपयाने महागला त्यात आता पोळी-भाजीची भर पडली आहे. बदलापुरात याआधी पोळीचा दर 7 रुपये होता. मात्र ग्राहकांना आता 8 रुपये मोजावे लागतील. 14 रुपयांना मिळणाऱ्या भाकरीसाठी 16 रुपये द्यावे लागतील.
100 ग्रॅम भाजीचा दर 25 रुपये होता त्यासाठी आता ग्राहकांना 30 रुपये द्यावे लागतील. तर वरण आमटी आणि कढीसाठी 20 रुपये मोजावे लागतील. गेल्या काही दिवसांपासून डाळ, साखर, तेल,तुप, गॅस सर्वांचेच दर वाढले आहेत. भाजीपाल्याचे दरही गगनाला भिडले आहेत. अनेक भाज्यांनी शंभरी गाठलीय. (Bhaji Poli Price Hike)
खर्च वाढल्याने नाईलाजास्तव पोळी-भाजीच्या दरात वाढ करावी लागत असल्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याची माहिती पोळी-भाजी केंद्र मालकांनी दिलीय. बदलापूर हे नोकरदारांचं शहर ओळखलं जातं. बहुतांश चाकरमानी सकाळी कामावर जाताना डब्याला पोळी-भाजी केंद्रातून पोळी-भाजी घेऊन जात असतात. वाढत्या महागाईमुळे त्यांच्या खिशाला चाट बसणार आहे.
