मुंबईला मागे टाकत या बाबतीत पुणे चौथ्या नंबरवर ! ; एकदा ही यादी पाहाच

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ जानेवारी ।।पुणे शहराचा जागतिक स्तरावरील एका नकोश्या यादीत समावेश झाला असून त्यांनी मुंबईकरांनाही मागे टाकलं आहे. ही यादी आहे तरी काय पाहूयात आणि त्यात देशातील कोणती शहरे आहेत जाणून घेऊयात…

भारतामधील सर्वाधिक ट्रॅफिक जॅम म्हणजेच वाहतूक कोंडी असणारं शहर कोणतं? असा प्रश्न विचारला तर नक्कीच मुंबई, बंगळुरु अशा शहरांची नावं आपल्यापैकी अनेकजण घेतील. मात्र या यादीमध्ये खरोखरच पहिल्या स्थानी असलेल्या शहराचं नाव पाहून धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेलं शहर हे राजधानी मुंबई अथवा उपराजधानी असलेलं नागपूर नाही. या यादीमध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेलं शहर हे जागतिक स्तरावरही सर्वाधिक ट्रॅफिक जॅमच्याबाबतीत चौथ्या स्थानी आहे.

2024 साली देशातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेलं शहर हे कोलकाता असल्याचं डच लोकेशन टेक्नोलॉजी स्पेशलिस्ट कंपनी असलेल्या टॉम टॉमच्या अहवालामधून समरो आलं आहे. यापूर्वी मागील वर्षी पहिल्या स्थानी बंगळुरु शहर होतं. यंदा बंगळुरु दुसऱ्या स्थानी आहे.

कोलकात्यामध्ये 10 किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी सरासरी 34 मिनिटं 33 सेकंदांचा कालावधी लागतो. त्या खालोखाल बंगळुरुचा क्रमांक लागत असून या शहरात 10 किमी अंतर कापायला 34 मिनिटं 10 सेकंद लागतात.

महाराष्ट्रातील लोकांसाठी आश्चर्याची बाब म्हणजे सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेलं शहर हे पुणे ठरलं आहे. पुण्यात 10 किलोमीटरचं अंतर कापायला सरासरी 33 मिनिटं लागतात. पुण्याखालोखाल चौथ्या क्रमांकावर हैदराबादचा क्रमांक लागतोय. इथे 10 किलोमीटर अंतर 32 मिनिटांमध्ये कापता येतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *