महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ जानेवारी ।। जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आयपीएल २०२५ स्पर्धा केव्हा सुरू होणार याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. आयपीएलचा आगामी हंगाम येत्या २१ मार्चपासून सुरू होणार आहे.
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबत माहिती दिली आहे. नुकताच बीसीसीआयची वार्षिक बैठक पार पडली. या बैठकीत हा चर्चा करण्यात आली आहे. राजीव शुक्ला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आयपीएलचे पुढील हंगाम २३ मार्चपासून सुरू होणार आहे. तर एका वरिष्ठ सदस्याने सांगितले की, ही स्पर्धा २० किंवा २१ मार्चला सुरू होऊ शकते.
तर, ईएसपीएनक्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, ही स्पर्धा २१ मार्चला सुरू होऊ शकते, तर २५ मे रोजी स्पर्धेतील अंतिम सामना खेळला जाईल. ही क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी झाल्यानंतर लगेच या स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. यापूर्वी आयपीएल २०२४ स्पर्धेचा थरार, २२ मार्चला सुरू झाला होता.
तर स्पर्धेतील अंतिम सामना २६ मे रोजी खेळवला गेला होता. या स्पर्धेतील पहिला सामना चेपॉकच्या मैदानावर रंगला होता. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.
बीसीसीआयच्या नवनियुक्त समितीची बैठक पार पडली. जय शहानंतर देवजित सौकिया यांची बीसीसीआयच्या सचिवपदी निवड करण्यात आली आहे. या बैठकीत काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. आयपीएलसह वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेबाबतही महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्पर्धेची तारीख आणि ठिकाण जवळजवळ निश्चित झालं आहे. आयपीएल २०२५ स्पर्धेतील सलामीचा सामना कोलकाताच्या इडन गार्डन्सच्या मैदानावर रंगणार असल्याचं म्हटलं जात आहे.