टेम्बा ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपवणार? चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिकेने जाहीर केला तगडा संघ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ जानेवारी ।। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. ही स्पर्धा येत्या १९ फेब्रुवारीपासून पाकिस्तान आणि युएईमध्ये रंगणार आहेत. या स्पर्धेसाठी सर्व संघांनी आपल्या स्क्वाडची घोषणा करायला सुरुवात केली आहे. सोमवारी ( १३ जानेवारी) दक्षिण आफ्रिकेनेही आपला संघ जाहीर केला आहे. या संघाचे कर्णधारपद टेम्बा बावुमाकडे सोपवण्यात आले आहे.

रॉब वॉल्टरच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघातील १० खेळाडू असे आहेत, जे २०२३ मध्ये भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत खेळताना दिसून आले होते.

या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने दमदार खेळ करत फायनलपर्यंत मजल मारली होती. या संघात २ वेगवान गोलंदाजांना कमबॅक करण्याची संधी देण्यात आली आहे. संघातील वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खिया आणि लुंगी एन्गिडी यांना कमबॅकची संधी दिली गेली आहे.

एनरिक नॉर्खिया सप्टेंबर २०२३ नंतर पहिल्यांदाच वनडे क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेदरम्यान त्याला दुखापतीमुळे संघाबाहेर व्हावं लागलं होतं. मात्र आता त्याचं कमबॅक झाल्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजी आक्रमणाची ताकद दुपटीने वाढणार आहे.

तर दुसरीकडे वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी ऑक्टोबर २०२४ नंतर मैदानात उतरला नव्हता. त्याला दुखापतीमुळे संघाबाहेर व्हावं लागलं होतं. आता तो चॅम्पियन्स ट्रॉफीतून कमबॅक करताना दिसून येणार आहे.

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी असा आहे दक्षिण आफ्रिकेचा संघ:
टेम्बा बवुमा (कर्णधार), टोनी डी झॉर्जी, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, वियान मुल्डर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्ट्जे, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रासी व्हॅन डेर डुसन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *