R Ashwin on Retirement: माझ्यात अजूनही क्रिकेट शिल्लक होतं, पण…; निवृत्तीवर अश्विनने………

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ जानेवारी ।। भारतीय संघाचा महान फिरकीपटू आर अश्विन याने ऑस्ट्रेलिया दौरा निम्म्यावर असताना निवृत्ती जाहीर केली. अश्विनचा या निर्णयाचा सर्वांना धक्का बसला, त्याने किमान ही मालिका पूर्ण होईपर्यंत तरी संघासोबत असायला हवे होते आणि निवृत्तीचा सामना खेळायला हवा होता, असे अनेकांचे मत होते. कर्णधार रोहित शर्मानेही अश्विनला निवृत्तीचा सामना खेळ, अशी गळ घातल्याचे वृत्त आले होते. पण, अश्विन तिसऱ्या कसोटीनंतर रोहितसह पत्रकार परिषदेत आला आणि हा माझा भारतीय संघाकडून शेवटचा दिवस, अशी घोषणा करून निघून गेला.

अश्विनने १०६ कसोटी सामन्यांमध् ५३७ विकेट्स घेतल्या. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत ३७ वेळा पाच बळी आणि आठ वेळा सामन्यात दहा बळी मिळवण्याची कामगिरी केली. कसोटीत आठवा सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अश्विन आठव्या क्रमांकावर आहे आणि अनिल कुंबळे (६१९ विकेट्स) नंतर भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज आहे. गोलंदाजीत कमाल दाखवणाऱ्या अश्विनने १५१ डावात ३५०३ धावा केल्या आहेत. ज्यात सहा शतकं आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे. ११६ वन डे सामन्यांमध्ये अश्विनने १५६ विकेट्स घेतल् आहेत. ७०७ धावा केल्या आहेत.

अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना त्याच्या निवृत्तीच्या निर्णयावर मौन सोडले. तो म्हणाला, माझ्यात अजूनही क्रिकेट शिल्लक होते आणि मी आणखी खेळू शकलो असतो. पण, तू निवृत्त का होत नाहीस, असा सवाल लोकांनी करण्यापूर्वी निवृत्त होणे, मला योग्य वाटले. मला हा ब्रेक आवश्यक होता. मी मालिका मध्यंतरातच सोडली. मी आता क्रिकेटवर जास्त बोलत नाही. सिडनी व मेलबर्न कसोटीनंतर मी सोशल मीडियावर काही पोस्ट केल्या होत्या. मी निवृत्तीबाबत बोलत नाही, कारण मी ड्रेसिंग रुमचा सदस्य होतो आणि त्याची गोपनियता राखणे महत्त्वाचे आहे.

तो पुढे म्हणाला, चाहते खूपच टॉक्सिक झाले आहेत. तुम्हाला हे माहित असले पाहिजे की कधीकधी ते सहजतेने केले जाते. लोक बरेच काही बोलत असतात पण तसे काहीही नसते. त्यावेळी मला वाटले की मी माझी सर्जनशीलता गमावली आहे. शेवट आनंदी देखील असू शकतो. जास्त अंदाज लावण्याचे कारण नाही.

त्याने निरोपाच्या सामन्याबद्दलही त्याचे मत मांडले. तो म्हणाला, मला विचाराल तर निवृत्तीचा सामना खेळणे इतके महत्त्वाचे नसते. मी हे प्रामाणिकपणे सांगतोय. विचार करा, जर मला निवृत्तीचा सामना खेळायला मिळाला असता, परंतु प्लेइंग इलेव्हनमध्ये मला यासाठी संधी मिळतेय कारण तो माझा निरोपाचा सामना आहे. त्या संघातील जागेचा मी हकदार नाही, तर तो निवृत्तीचा सामना खेळण्यात काय अर्थ आहे. माझ्यात क्रिकेट खेळायची अजूनही ताकद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *