महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ जानेवारी ।। मुंबईतील काही क्रिकेट नायकांमध्ये दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर, भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि माजी खेळाडू विनोद कांबळी यांचा समावेश आहे. रविवारी वानखेडे स्टेडियमच्या ५० व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या उद्घाटन समारंभात मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) त्यांचा गौरव केला. या कार्यक्रमात विनोद कांबळी ज्या पद्धतीने स्टेजच्या दिशेने चालले होते. ते अजूनही किती कमकुवत आहे हे त्याच्यावरून स्पष्ट होते. दोन जणांनी कांबळीचा हात धरून स्टेजवर आणले. त्यांना नीट चालता येत नव्हते तर त्यानंतर विनोद कांबळी मंचावर आले आणि त्यांनी गावस्कर यांची भेट घेतली आणि त्यांचे पायही स्पर्श केले.
विनोद कांबळी म्हणाले,” मला आठवते की मी माझे पहिले द्विशतक इंग्लंडविरुद्ध येथे झळकावले आणि त्यानंतर माझ्या कारकिर्दीत आणखी अनेक शतके झळकवली. माझ्यासारख्या किंवा सचिन (तेंडुलकर) सारख्या कोणाला भारतासाठी खेळायचे असेल तर मी तुम्हाला सल्ला देईन की कठोर परिश्रम करत राहा आणि ते करणे थांबवू नका कारण आम्ही दोघांनी लहानपणापासून हेच केले आहे.”
Good to See The Great vinod Kambli walking in his Feet 🙏🙏#50YearsWankhede#Vinodkambli pic.twitter.com/ckqsFRSkoa
— kumar (@KumarlLamani) January 13, 2025
नुकतीच विनोद कांबळी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना २१ डिसेंबर रोजी ठाण्यातील रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर ते तंदुरुस्त झाले आणि त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. याआधी ते आणखी एका सार्वजनिक कार्यक्रमात दिसले होते. विनोद कांबळी गुरु आचरेकर यांच्या स्मृतिचिन्हाच्या उद्धघाटनाच्या कार्यक्रमाला दिसले होते. या कार्यक्रमाला आचरेकर सरांच्या सर्व शिष्यांना आमंत्रण दिले होते.
विनोद कांबळी यांची कारकीर्द
५२ वर्षीय विनोद कांबळी यांनी १९९१ ते २००० दरम्यान भारतीय क्रिकेट संघासाठी १७ कसोटी आणि १०४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीत कांबळीने ५४.२ च्या सरासरीने फलंदाजी करताना १०८४ धावा केल्या. या काळात कसोटीत त्याच्या बॅटने ४ शतके आणि ३ अर्धशतकेही झळकवली. एकदिवसीय सामन्यांमध्ये कांबळीने ३२.६ च्या सरासरीने २४७७ धावा केल्या होत्या. कांबळीने वनडे फॉरमॅटमध्ये २ शतके आणि १४ अर्धशतके झळकावली आहेत.