Kinkrant 2025 : किंक्रात म्हणजे काय? का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या सविस्तर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ जानेवारी ।। भोगी आणि मकर संक्रांतीनंतर साजरा केला जाणारा सण म्हणजे किंक्रात (Kinkrant 2025). या दिवसाला करिदिन म्हणून देखील ओळखले जाते. दरवर्षी हा सण १५ जानेवारीला साजरा करण्यात येतो. शास्त्रानुसार या दिवसाला अशुभ मानले जाते. मात्र यामागचं नेमकं कारण आणि पौराणिक कथा काय आहे जाणून घ्या.

काय आहे कथा?
संकारसुर नावाचा राक्षस होता. तो गरिबांना प्रचंड प्रमाणाता त्रास देत असे. त्याचा वध करण्यासाठी देवीने संक्रांतीचे रुप घेतले. त्यानंतर संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुरा नावाच्या राक्षसाला ठार मारले होते आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो.

किक्रांत कशी साजरी केली जाते?
किंक्रांतच्या दिवशी देवीने किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. या दिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी किंक्रांतच्या दिवशी स्त्रिया हळदीकुंकू समारंभ साजरा करतात.

किंक्रात दिवशी हे करु नये
या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असे सांगितले जाते. तसेच किंक्रांतीला मोकळे केस सोडून काम करणे वर्ज्य मानले जाते. घरात सतत भांडण होत असतील तर या दिवशी शांत राहायला हवे. लांबचा प्रवास टाळायला हवा.

किंक्रात कशी साजरी करावी?
किंक्रांतला भोगीच्या दिवशी केलेली भाकरी राखून ठेवली जाते आणि ती शिळी भाकरी खाल्ली जाते, केरकचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असे सांगितले जाते, तसेच, यादिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याचीही प्रथा आहे. या दिवशी संक्राती देवीची पूजा करून तिला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. त्याचप्रमाणे कुलदैवताचे नामस्मरण केले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *