UPI Payment: इंटरनेटशिवाय UPI पेमेंट कसं करायचं? या सोप्या स्टेप्स करा फॉलो

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ जानेवारी ।। सध्या डिजिटल पेमेंटचे प्रमाण खूप वाढत आहे. अगदी भाजी घेण्यापासून ते जेवणापर्यंत सर्वांचे बिल आपण ऑनलाइन पद्धतीने भरतो. यूपीआयचा वापर करुन व्यव्हार करणे खूप सोपे झाले आहे. यूपीआयचा वापर हा आपण इंटरनेटद्वारे करतो. परंतु कधीकधी आपल्या फोनचे नेट बंद होते अशा परिस्थितीत तुम्ही इंटरनेटशिवाय यूपीआय पेमेंट करु शकतात. (UPI Payment)

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने नवीन सेवा सुरु केली आहे. ज्यात तुम्ही इंटरनेशिवाय यूपीआय पेमेंट करु शकतात.युजर्स USSD कोड *99# डायल करुन ऑफलाइन बँकिंगचा लाभ घेऊ शकतात.

या सुविधेमुळे तुम्ही इंटरबँक फंड ट्रान्सफर, बॅलेन्स चेक करणे, यूपीआय पिन सेट करणे ही काम करु शकतात. यामुळे तुम्ही आता इंटरनेट नसतानाही पैसे पाठवू शकणार आहे. यामुळे जर तुम्हाला कधी इंटरनेट कनेक्शन मिळत नसेल तर काळजी करु नका. यूपीआयच्या या नवीन सेवेचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे.

इंटरनेटशिवाय पेमेंट कसं करायचं? (How to do UPI Payment Without Internet)

सर्वप्रथम तुम्ही तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरुन *99# डायल करा.

यानंतर तुम्हाला हवी असलेली भाषा निवडा.

यानंतर बँकिंग सेवा निवडा. यात पैसे पाठवणे, बॅलेंस चेक करणे याचा समावेश होतो.

यानंतर पैसे पाठवण्यात १ टाइप करा असे सांगितले जाईल. त्यानंतर ते बटण दाबा.

पैसे पाठवण्याची पद्धत निवडा. मोबाईल, यूपीआय आयडी किंवा सेव्ह केलेला नंबर असे पर्याय निवडा.

यानंतर तुम्हाला पेमेंटची रक्कम टाकावी लागेल. त्यानंतर तुमचा यूपीआय पिन टाकावा लागेल.

तुम्ही इंटरनेटशिवाय पेमेंट करु शकणार आहे. पेमेंट करताना नेहमी समोरच्या व्यक्तीचा फोन नंबर, यूपीआय आयडी चेक करा त्यानंतरच पेमेंट करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *