Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांसाठी आर्थिक दंडाचे संकेत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ जानेवारी ।। महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप चर्चेत आहे. लाडकी बहीण योजना महायुतीच्या विजयासाठी गेम चेंर्जर ठरली. त्यांनतर आता या योजनेबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अपात्र महिलांना स्वतः हून नावे कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं सांगण्यात येत आहे.


महायुतीचं सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची तपासणी सुरु होणार असल्याची चर्चा होती. मात्र, फक्त तक्रारी आल्यास तुमच्या अर्जाची तपासणी केली जाईल, असं आदिती तटकरे यांनी सांगितलं होत. त्यांनतर आता महिला व बालकल्याण विभागाने याबाबत माहिती दिली आहे.लाडकी बहीण योजनेत निकषात न बसणाऱ्या महिलांना एकतर स्वतः हून नाव बाद करा किंवा पैसे भरावेत, असं सांगण्यात आलं आहे. अपात्र असलेल्या महिलांना योजनेतून नाव कमी करावे किंवा महिला व बालकल्याण विभागाच्या लेखाशिर्षावर पैसे भरावेत, अशी सूचना महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यांनी केली आहे.

 

लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरीत करण्यात आला आहे. त्यानंतर आता जानेवारी महिन्याच्या हप्त्याची वाट महिला पाहत आहे.अशातच आता अपात्र लाडक्या बहि‍णींना स्वतः हून अर्ज बाद करण्यास सांगितले आहे. दरम्यान, आता ज्या महिला निकषात बसत नाही त्यांनी नाव मागे घ्यावेत किंवा ती रक्कम दंडासहित वसून केली जाईल, असं वक्तव्य छगन भुजबळांनी केले होते. त्यानंतर अपात्र लाडक्या बहि‍णींना दंड भरावा लागणार असल्याची चर्चा सुरु होती.याआधी धुळ्यातील आणि पुण्यातील दोन महिलांनी अर्ज स्वतः हून बाद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *