महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ जानेवारी ।। नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोन्या- चांदीच्या दरात सतत चढ-उतार पाहायला मिळत आहे. वर्ष २०२५ च्या पहिल्या आठवड्यात सोन्याचा दर ७८, ६९० रुपयांवर असलेला सोन्याचा दर आज ७९, ५२० रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीचा दर ९२ हजारांवरुन आता ९३ हजारांच्या आसपास पोहोचला आहे. आठवड्याभराचा विचार केल्यास २४ कॅरेट सोन्याचा दर ८३० रुपयांनी वाढला आहे, तर १ किलो चांदीचा दर ९२,६०० वरुन ९२,९२० रुपयांवर पोहोचला आहे.
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज देशात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचे दर ७९,३५० रुपये आहे, तर २२ कॅरेटचे दर ७२,७३८ रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचे दर ९२६ रुपये आहे तर १ किलो चांदी९२,५८० रुपयांनी विकली जात आहे. त्यामुळे आज गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत सोन्या-चांदीचे दरात वाढ झाल्याची दिसून आली आहे. यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमध्येही सोन्या- चांदीच्या दरात चढ-उतार झाले आहेत.
आदल्या दिवशीचा म्हणजे १६ जानेवारी २०२५ रोजी १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७९,५२० रुपये होता, तर १ किलो चांदीचा दर ९२, ९२० रुपये होता. यावरुन तुमच्या लक्षात येईल की, आज सोन्याचे दर कालच्या तुलनेत आज १७० रुपयांची कमी झाला आहे, तर चांदी जवळपास ३४० रुपयांनी स्वस्त झाली आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार जाणून घेऊया तुमच्या शहरांमधील सोन्या-चांदीचे दर
शहर २२ कॅरेट सोन्याचा दर २४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७२,५६२ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ७९,१६० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७२,५६२ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७९,१६० रुपये आहे.
नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७२,५६२ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७९,१६० रुपये इतका आहे.
नाशिक प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७२,५६२ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७९,१६० रुपये आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)