इंटरनेट वापरण्यात देशात हे राज्य अव्वल ; पहा महाराष्ट्र कितव्या स्थानी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ जानेवारी ।। देशात सर्वात जास्त इंटरनेट वापरण्यामध्ये केरळ राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. गोवा दुसऱया तर महाराष्ट्र तिसऱया स्थानावर आहे. केरळ राज्यात 72 टक्के लोक इंटरनेटचा वापर करतात. गोव्यात 71 टक्के तर महाराष्ट्रात 70 टक्के लोक इंटरनेट वापरत असल्याची माहिती इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया आणि कांतारच्या रिपोर्टमधून उघड झाली आहे. देशात सध्या इंटरनेट वापरणाऱयांची संख्या 886 मिलियन आहे. ती लवकरच 90 कोटीपार म्हणजे 900 मिलियन होण्याची शक्यता आहे. देशाच्या ग्रामीण भागात सुद्धा इंटरनेट यूजर्सची संख्या वाढत आहे. एकूण इंटरनेट यूजर्सची संख्या आता 55 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. जवळपास सर्वच इंटरनेट यूजर्संनी या ग्रोथमध्ये 98 टक्के लोकांनी हिंदुस्थानी भाषेच्या पंटेटचा वापर केला आहे. यामध्ये तमिळ, तेलुगु आणि मल्याळम सर्वात जास्त लोकप्रिय आहे. 10 पैकी 9 इंटरनेट यूजर्स एम्बेडेड एआय कॅपिसिटीच्या अॅप्सचा वापर करत असल्याचेही या रिपोर्टमधून समोर आले आहे.ओटीटी व्हिडीओ, म्युझिक स्ट्रिमिंग, ऑनलाईन कम्युनिकेशन आणि सोशल मीडियाचा सर्वात जास्त वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. इंटरनेट यूजर्स दररोज सरासरी 90 मिनिटे इंटरनेटचा वापर करतात. ज्यात शहरी यूजर्स 94 टक्के तर ग्रामीण यूजर्स 89 टक्के इंटरनेटचा वापर करतात.

देशात शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात इंटरनेट वापरत असल्याचे समोर आले आहे. इंटरनेट यूजर्संमध्ये 58 टक्के महिला असल्याची माहिती या अहवालातून समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *