७५२ धावा करणाऱ्या Karun Nair ची निवड का केली गेली नाही? अजित आगरकर स्पष्ट म्हणाले……..

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ जानेवारी ।। कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी शनिवारी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठीचा संघ जाहीर केला. १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. भारतासमोर यजमान पाकिस्तानसह बांगलादेश व न्यूझीलंड यांचे आव्हान असणार आहे आणि टीम इंडियाचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. आजची संघाची घोषणा होण्यापूर्वी बीसीसीआयने १० कडक नियम बनवले होते आणि त्यातला प्रमुख नियम म्हणजे देशांतर्गत क्रिकेटला प्राधान्य. राष्ट्रीय कर्तव्यावर नसताना खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळायलाच हवे. या स्पर्धेचा विचार राष्ट्रीय संघ निवडीसाठी केला जाणार, असेही म्हटले गेले होते. पण, आजच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील संघाकडे पाहता BCCI या शब्दाला जागल्याचे दिसले नाही.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघाची घोषणा होण्यापूर्वी Karun Nair हे नाव खूप चर्चेत राहिले. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विदर्भच्या कर्णधाराने ८ सामन्यांत ७५२च्या सरासरीने ७५२ धावा चोपल्या आहेत. त्यात ५ शतकांचा समावेश आहे आणि त्यामुळेच त्याची संघात निवड व्हायला हवी, अशी मागणी होत होती. पण, त्याच्याकडे काणाडोळा केला गेला.. करुणसह यंदाची विजय हजारे ट्रॉफी गाजवणाऱ्या अशा बऱ्याच फलंदाजांकडे दुर्लक्ष केले गेले आहे.

करूण नायर – ८ सामने, ७५२ धावा, ५ शतकं व १ अर्धशतक

मयांक अग्रवाल – ९ सामने, ६१९ धावा, ४ शतकं व १ अर्धशतक

सिद्धेश वीर – ९ सामने, ५२० धावा, २ शतकं व २ अर्धशतकं

प्रभसिमरन सिंग – ८ सामने, ४९८ धावा, ३ शतकं

अभिषेक शर्मा – ८ सामने, ४६७ धावा, १ शतक व ३ अर्धशतकं

अंकित कुमार – १० सामने, ४६७ धावा, १ शतक व ३ अर्धशतकं

अर्शदीप सिंग – ७ सामने, २० विकेट्स, ५.६२ इकॉनॉमी ( निवड झाली)

वरुण चक्रवर्थी – ६ सामने, १८ विकेट्स, ४.३६ इकॉनॉमी

श्रेयस गोपाळ – ९ सामने, १८ विकेट्स, ४.९२ इकॉनॉमी

अंशूल कंबोज – १० सामने, १७ विकेट्स, ४.५६ इकॉनॉमी

चिंतन गजा – ८ सामने, १६ विकेट्स, ४.६२ इकॉनॉमी

करुण नायरला संधी का नाही?
निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांना करुण नायरबाबत विचारले गेले तेव्हा त्यांनी सांगितले की, ७०० हून अधिक सरासरीने धावा करणे सोपी गोष्ट नाही. ही खूप खास कामगिरी आहे. पण, सध्याच्या घडीला टीम इंडियात संधी मिळणे अवघड आहे. असं नाही, की त्याच्या कामगिरीबाबत आम्ही चर्चा केली नाही. पण, संघात सध्या तशी जागा नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *