महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२१ जानेवारी ।। गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याचे भाव वाढत आहे. सोन्याचे भाव वाढत असल्याने खरेदीदारांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. सोने चांदीचे भाव पुन्हा एकदा कमी होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. यामागचे कारण म्हणजे मागील वर्षी अर्थसंकल्पान सोन्यावरील इंपोर्ट ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. (Gold Price May Be Decrease)
मागील वर्षी २३ जुलै २०२४ मध्ये निर्मला सितारामन यांनी सोन्यावरील इंपोर्ट ड्यूटी १५ टक्क्यांवरुन ६ टक्के केली होती. यामुळे सोन्याचे भाव चांगलेच कमी झाले होते. त्यामुळे यावर्षी सोन्याचे भाव कमी होणार की नाही असा प्रश्न आता अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.
मागील वर्षी बजेटच्या आधी सोन्याचे भाव ८२ हजारांच्या घरात होते. त्यानंतर त्यावरील इंपोर्ट ड्युटी ६ टक्के करण्यात आली. त्यानंतर ७ ते १० दिवसांमध्ये सोन्याचे भाव ६००० रुपयांनी घसरले. सोने ७६००० रुपये प्रति तोळा होते. त्यानंतर सोन्याच्या किंमती काही दिवस कमी झाल्या होत्या. त्यानंतर पुन्हा सोन्याच्या किंमती वाढल्या आहे. (Gold Price Fall)
काही रिपोर्टनुसार, जगातील ११ टक्के सोने हे भारतात आहे. भारतीय महिलांकडे तब्बल २४,००० टन सोने आहे. त्यामुळे भारतात सोन्याची डिमांड जास्त आहे. त्यामुळे इथे सोने जास्त स्वस्त होणे कठीण असल्याचे सांगितले जात आहे.
यावर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही असेच काही निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित सोन्याच्या किंमती कमी होऊ शकतात. परंतु याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. दरम्यान आता सोन्यासारखेच चांदीलाही हॉलमार्किंग करावे, अशी मागणी होत आहे. चांदीदेखील शुद्ध आहे की नाही हे समजण्यासाठी हॉलमार्किंग करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, एकीकडे सोन्याच्या किंमती वाढत आहे. दुसरीकडे सोन्यावरील जीएसटी कमी करण्याची मागणी केली जात आहे. जेम्स अँड ज्वेलरी इंडस्ट्रीची ही मागणी आहे. सोन्यावरील जीएसटी हा १ टक्के करावा अशी मागणी केली जात आहे