IND Vs ENG: सूर्याच्या नेतृत्वात आतापर्यंत भारत अपराजित …पहिल्यांदा इंग्लंडविरुद्ध मालिका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२१ जानेवारी ।। भारतीय क्रिकेट संघ आता आपल्या पुढील मिशनच्या अगदी जवळ आला आहे. संघाला घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. याचा पहिला सामना २२ जानेवारीला कोलकाताच्या इडन गार्डनवर रंगणार आहे. या टी-२० मालिकेत सूर्यकुमार यादव नेतृत्व करत आहे.

कर्णधार म्हणून सूर्याची आपल्या करिअरमधील सहावी द्वीपक्षीय टी-२० मालिका आहे. त्याच्या नेतृत्वात आतापर्यंत जबरदस्त रेकॉर्ड राहिला आहे. सूर्याच्या नेतृत्वात भारतीय संघाला अद्याप एकही पराभव मिळालेला नाही. सोबतच सूर्या इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिकेत पहिल्यांदा नेतृत्व करत आहे.

सूर्याच्या नेतृत्वात या ४ संघाना दिली मात
सूर्यकुमार यादवला पहिल्यांदा नेतृत्व करण्याची संधी २०२३मध्ये मिळाली होती. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर टी-२० मालिकेचे नेतृत्व केले होते. पाच सामन्यांच्या या टी-२० मालिकेत भारतीय संघाने ४-१ अशी बाजी मारली होती. यानंतर सूर्याच्या नेतृत्वात भारतीय संघांचा विजयरथ पुढे चालत राहिला.

ऑस्ट्रेलियानंतर सूर्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका संघाचा दौरा केला. येथे २ सामन्यांची टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. यानंतर श्रीलंकेला त्यांच्याच भूमीवर २-० असे हरवले. तर बांगलादेशला ३-० असे क्लीन स्वीप केले.

सूर्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने शेवटची टी-२० मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नोव्हेंबर २०२४मध्ये खेळली होती. चार सामन्यांच्या या मालिकेत द्वीपक्षीय टी-२० मालिका भारतीय संघाने ३-१ अशी आपल्या नावे केली होती. आता सूर्यासमोर इंग्लंड संघाचे आव्हान आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *